उत्सुकता भविष्याची…(14 मे ते 20 मे 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर 

मेषेत बुध, हर्षल, वृषभेत, रवी, शुक्र, कर्केत राहू, तुळेत गुरू वक्री, धनुमध्ये शनी व प्लुटो वक्री, मकरेत मंगळ, कुंभेत नेप्चून आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. सतर्क व सजगवृत्ती ठेवून कामात सहभागी व्हा. मनावर संयम ठेवावा लागेल. एखादी आनंदवार्ता मुड बदलेल.

मेष : उतावळेपणा नको
व्यवसायात उतावळेपणा करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. घाईने निर्णय न घेता वरिष्ठांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नोकरदार व्यक्तींना सहकारी व वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल ही अपेक्षा करू नये. कामाचा व्याप वाढेल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. ओळखीचा जास्त फायदा होईल. महिलांना कामाचा ताण पडेल. तरी चिडचिड करू नये. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19,20

वृषभ : कामांना गती येईल
ग्रहाची साथ आहे. त्यामुळे नवीन कामांना गती येईल. व्यवसायात कामात उलाढाल वाढेल. पैशाची चिंता मिटेल. प्रसन्न वातावरण राहील. नोकरीत हातून कौतुकास्पद कार्य घडेल. बढती मिळण्याची शक्‍यता आर्थिक लाभ होतील. शुभवार्ता कळतील महिलांना घरासाठी नवीन खरेदीचे योग येतील. प्रकृतीची मात्र कुरबूर राहील. तरी काळजी घ्या. कलाकार, खेळाडूंना मानसन्मान मिळतील.
शुभ दिनांक : 16,17,18,19,20

मिथुन : अनपेक्षित खर्च
“आपले काम बरे की आपण बरे’ हे धोरण लाभदायी ठरेल. व्यवसायात अनपेक्षित खर्च वाढतील पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत जिभेवर साखर पेरून बोलावे. फुकटाचे सल्ले देऊ नयेत. सहकारी कामात मदत करतील. सर्वांशी मिळून मिसळून रहाल. महिलांना खर्चाची हातमिळवणी करताना नाकीनऊ येतील. अवास्तव खर्च टाळा. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत. याची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 14,15,18,19,20

कर्क : यश संपादन कराल
अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश संपादन कराल. धंदा व्यवसायात कामांना झालेला विलंब आर्थिक फटका देईल. कामाच्या कार्य पद्धतीत बदल करून नुकसान भरपाई करण्याचा इरादा राहील. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. वरिष्ठ खूश राहतील. सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्या. महिलांना चिंता निरसन झाल्याचे मानसिक समाधान मिळेल. आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 14,15,16,17,20

सिंह : कामे दृष्टीक्षेपात येतील
व्यवसायात लवचिक धोरण लाभदायी ठरेल. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. आर्थिक बाबतीत चोखंदळ रहा. नोकरीत केलेल्या कामाचे यश मिळेल. कामा निमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. अधिकार मिळतील. महिलांना कामाचा आनंद मिळेल. प्रकृती स्वास्थ्याबाबत थोडी कुरबूर राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19

कन्या : नवीन ओळखी होतील
बौद्धिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळेल. व्यवसाय वृद्धिंगत होईल. कामाच्या पद्धतीत बदल करून प्रगती कराल. कामा निमित्ताने नवीन ओळखी होतील. प्रवास घडेल. प्रवासात विशेष काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळेल. केलेल्या कामाचे श्रेय देतील. महिलांना कौटुंबिक सुख व आर्थिक उब मिळेल. मन प्रसन्न राहील. बरेच दिवसांनी खरा आनंद मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहील.
शुभ दिनांक : 16,17,18,19,20

तूळ : वादविवाद होणार
व्यवसायात कामाचा उरक पाडाल. कामाचा मनस्वी कंटाळा असेल. त्यामुळे विश्रांती घ्याल. पैशाची वसुली करण्यावर लक्षे केंद्रित कराल. नोकरीत कामात चालढकल कराल. सहकाऱ्यांवर बरीचशी मदार राहील. गैरसमजुतीने वादविवाद होणार नाहीत, याकडे लक्ष द्या. अनावश्‍यक ठिकाणी वाद टाळणे हेच योग्य. महिलांना घरात मनाविरुद्ध वागावे लागेल, तरी चिडू नका. आवडत्या छंदात मन रमवावे.
शुभ दिनांक : 14,15,18,19,20

वृश्चिक : आज्ञेचे पालन करा
सर्व महत्त्वाचे ग्रह अनुकूल नाहीत. तरी धाडस करू नका. व्यवसायात प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका.
स्वतःची कुवत ओळखून कामे स्वीकारा. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करणे, हिताचे ठरेल. गोड बोलून खुबीने सहकाऱ्यांकडून कामे करून घ्या. बेकार व्यक्तींना नवीन कामाची संधी दृष्टीक्षेपात येईल. घरात महिलांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. विश्रांती घ्याल. मुलांकडून त्रास होण्याची शक्‍यता.
शुभ दिनांक : 16,17,20

धनु : मन प्रफुल्लित होईल
“रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती सध्या तुमची असेल. कामाचे योग्य नियोजन भविष्यात लाभदायी ठरेल. व्यवसायात प्रगती होईल. कामे मार्गी लागतील. उत्साही रहाल. नोकरीत केलेल्या कष्टाचे चीज होईल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. महिलांना आनंदाची बातमी मन प्रफुल्लित करेल. नवीन खरेदीचे बेत ठरतील. तरूणांना मनपसंत जीवन साथी भेटेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.
शुभ दिनांक : 14,15,18,19

मकर : मनाप्रमाणे खर्च कराल
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृती करा. यश मिळेल. व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब फायदे मिळवून देईल. पैशाची स्थिती समाधानकारक असल्याने मनाप्रमाणे खर्च करू शकाल. नोकरीत वरिष्ठांच्या विरोधात उभे रहाल. त्याचा भविष्यात फायदाच होईल. मानसिक समाधान मिळेल. घरात महिलांना दगदग धावपळ वाढेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. तरूणांना नवीन सहवासाचे आकर्षण वाटेल.
शुभ दिनांक : 14,15,16,17,20

कुंभ : धंद्यातून विशेष लाभ
“हाती घ्याल ते तडीस न्याल’ व्यवसायात कामात विशेष चमक दाखवाल. जुनी येणी वसुल होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत किचकट कामे हाती घ्याल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या विश्‍वास पात्र ठरेल. त्यांची मर्जी राखण्यात यश मिळवाल. जोड धंद्यातून विशेष लाभ मिळू शकेल. महिलांना कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत खेळाडूंना नैपुण्य मिळेल.
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19

मीन : नवीन संधी मिळतील
आनंदी वातावरण मन प्रसन्न राखेल व्यवसायात कामांना गती येईल. पैशाची चिंता मिटेल. नवीन कामेही मिळतील. नोकरीत कामात जोश येईल. नवीन संधी मिळेल. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. प्रकृतीची विशेष काळजी घ्या. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. मन प्रसन्न राहील. स्वप्ने साकार होतील.
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19,20


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)