उत्सुकता भविष्याची…(11 ते 17 जून 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर 

लग्नी हर्षल, धनस्थानात रवी, तृतीयेत बुध, चतुर्थात राहू व शुक्र, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लुटो व शनी वक्री दशमात मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळेल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पैशाची चिंता मिटेल. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल. 

मेष : दगदग धावपळ वाढेल 
नोकरी व्यवसायात आवश्‍यक ते फेरबदल कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. ती चिकाटीने व सातत्याने पूर्ण करा आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामात तत्पर रहा व मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उचला. कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महिलांचा वेळ कलेत व मनोरंजनात मजेत जाईल. प्रिय व्यक्तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनासाथी मिळेल.
शुभ दिनांक :11,12,13,14,15,16, 17

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृषभ : कामाचे श्रेय मिळेल 
नोकरी व व्यवसायात डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल. त्यासाठी लागणाऱ्या आवश्‍यक गोष्टींची पूर्तताही होईल. हितचिंतकांची मदत उपयोगी पडेल. नोकरीत नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. कौटुंबिक सोहळा साजरा कराल. वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
शुभ दिनांक :12,13,14,15,16,17

मिथुन : बेत सफल होतील 
पैशाची स्थिती चांगली राहील त्यामुळे मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे आखलेले बेत सफल होतील. नवीन कामामुळे उत्साह वाढेल. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळेल. नवीन पदभार स्वीकाराल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. घरात सांसारिक जीवनात गोड व उत्साहवर्धक बातमी कळेल. छोटा प्रवास कराल. पाहुण्यांची सरबराई कराल. तरुणांचे विवाह पार पडतील.
शुभ दिनांक : 11, 14, 15, 16, 17

कर्क : नवीन खरेदी होईल 
व्यवसायात बराच काळ रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील. आर्थिक आवक वाढेल. नोकरीत तुमचे कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. लवचिक धोरण ठेवलेत तर सर्वांशी संबंध सलोख्याचे राहतील. घरात महिलांची नवीन खरेदी होईल. गृहसजावटीसाठी चार पैसे जादा खर्च होतील. पाहुण्यांचे स्वागत आनंदाने कराल. खेळाडू, कलाकारांना त्यांचे क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल.
शुभ दिनांक : 11, 12, 13, 16, 17

सिंह : पैशांची चिंता मिटेल 
व्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या कौतुकास पात्र ठराल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांनी कार्यतत्पर रहावे. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या भेटीने आनंद वाटेल. मेजवानीचा योग येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.
शुभ दिनांक : 11, 12, 13, 14, 15, 16

कन्या : कामात गुप्तता राखा 
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यवसायात बदल कराल. कामाचे योग्य नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात चोखंदळ रहाल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. नोकरीत कामाचा कंटाळा आला तरी हातातील कामे वेळेत पूर्ण कराल. कामात गुप्तता राखा. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. . प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. तरुणांनी अति धाडस टाळावे.
शुभ दिनांक : 12, 13, 14, 15, 16, 17

तूळ : यशप्राप्ती होईल 
नोकरी व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर फायदा होईल. कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. यशप्राप्ती होईल. नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. पैशाचे व्यवहारात गाफील राहू नका. जोडधंद्यातून कमाई होईल. महिलांना थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. जुने स्नेहसंबंध पुन्हा निर्माण होतील. प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान.
शुभ दिनांक : 11, 14, 15, 16, 17

वृश्‍चिक : कौतुकास पात्र व्हाल 
अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून कौतुकास पात्र व्हाल. व्यवसायात कामामुळे दगदग धावपळ वाढेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. कामात चोखंदळ राहा. स्वतःचे काम करून इतरांनाही कामात मदत कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल. कलाकार खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. घरात नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक : 12, 13, 16, 17

धनु : टीका करण्याचे टाळा 
मनातील सुप्त इच्छा आकांक्षा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नशील रहाल. व्यवसायास इप्सित साध्य करण्याचा चंग बांधाल. हाती घेतलेले काम तडफेने पूर्ण कराल. नोकरीत एखादी वृत्ती सोडून सामंजस्याने वागावे. सहकाऱ्यांच्या मर्मावर बोटे ठेवून टीका करण्याचे टाळावे. महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. तब्येतीची काळजी घ्यावी. तरुणांनी अविचाराने वागू नये. सामूहिक कामात मन गुंतवावे.
शुभ दिनांक : 11, 14, 15

मकर : प्रसिद्धीचा योग 
कामाचा ताण वाढला तरी कर्तव्यात कसूर करू नका. व्यवसायात अनपेक्षित अडचणी आल्या तरी निराश न होता कार्य करीत रहा. यश हमखास मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावनाशीलता नको. नोकरीत पैशाच्या मोहापासून चार हात लांब रहा. सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या मगच मत प्रकट करा. कुठलीही अपेक्षा न ठेवता वागा. कामानिमित्त प्रवासाचे योग. बरेच पैसे खर्च होतील. खेळाडूंना प्रसिद्धीचे योग.
शुभ दिनांक : 11, 12, 13, 16, 17

कुंभ : यशाचा मार्ग निवडाल 
संथ गतीने पण हमखास यशाचा मार्ग निवडाल. व्यवसायात कामाच्या कार्यपद्धतीत बदल करणे अनिवार्य होईल. फायदा मिळवून देणारी कामे प्रामुख्याने हाती घ्याल. नोकरीत आळस झटकून कामे उरका. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन काटेकोरपणे करा. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल. तरुणांना जोडीदाराची साथ उत्तम मिळेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 11, 12, 13, 14, 15

मीन : राग आवरा 
नोकरी व्यवसायात आर्थिक बाबतीत फारशी हालचाल नको. कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक पावले टाका. राग आला तरी प्रकट करू नका. शांत रहा हातातील कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. महिलांनी तात्विक मतभेद टाळावेत. आपल्या आवडीच्या छंदात मन रमवावे आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील.
शुभ दिनांक :11,12,13,14,15,16,17

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)