उत्सुकता भविष्याची…(9 जुलै ते 15 जुलै 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर

अग्नी हर्षल, चतुर्थात राहू व बुध, तृतीयेत रवी, पंचमात शुक्र, सप्तमात गुरू, भाग्यात शनी व प्लुटो वक्री, दशमानात केतू व मंगळ वक्री तर लाभात नेप्च्यून वक्री आहे. ग्रहमानाची साथ मिळाल्याने उत्साह दांडगा राहील. वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल, मन. आनंदी राहील. चांगली बातमी कळेल. आरोग्य चांगले राहील.

मेष : व्यवसायात कार्यक्षमता
सर्व महत्वाचे ग्रह अनुकुल आहेत. व्यवसायात कार्यक्षमता वाढेल, कामाचा उरक दांडगा राहील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. जादा सुविधा व सवलती मिळतील. नोकरदार महिलांना सहकाऱ्यांची मदत कामात होईल. महिलांना गृह सौख्याचा अनुभव घेता येईल. वेळेचा सदुपयोग होईल. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 9,10,11,12,13,14,15.

वृषभ : शारीरिक आरोग्य उत्तम
मानसिक व शारिरीक आरोग्य उत्तम राहील. आत्म विश्‍वासाने नव्या कामांना लागाल. व्यवसायात कल्पकता दाखवून कामे मार्गी लावाल. चांगल्या घटना मन प्रसन्न करतील. जादा कामाची तयारी असेल तर वर कमाई करता येईल. नोकरीत इतरांचे छान सहकार्य मिळेल. केलेल्या कामाचे कौतुकच सर्वजण करतील. तरूणांचे विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 10,11,12,13,14,15.

मिथुन : स्वप्ने साकार होतील
“मनी वसे ते स्वप्नी दिसे’ ह्या म्हणीचे प्रत्यंतर सप्ताहात होईल. व्यवसायात स्वप्ने साकार होतील. नवीन पाऊल त्या दिशेने टाकाल. अधिक गुंतवणूक करणे भाग पडेल. विरोध मावळेल. कामे गती घेतील. नोकरीत तुमची व तुमच्या कामाची किंमत इतरांना कळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. महिलांना कामाचा हुरूप येईल. प्रकृतीमान चांगले राहील.
शुभ दिनांक : 9,12,13,14,15.

कर्क : कर्तव्यपूर्तीकडे लक्ष द्या
“रात्र थोडी सोंगे फार’ अशी स्थिती तुमची होईल. व्यवसायात नजरेच्या टप्प्यात कामे असतील ती वेळेत पूर्ण करणे हेच उद्दिष्ट राहील. कर्तव्य पूर्तीकडे विशेष लक्ष द्याल. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत कर्तुत्व दाखवण्याची सुसंधी मिळेल. कामात बिनचूक राहून कामे वेळेत पूर्ण करा. महिलांनी कौटुंबिक प्रश्‍नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शुभ दिनांक : 9,10,11,14,15.

सिंह : मनाप्रमाणे पैसे खर्च कराल
काही संस्मरणीय घटना या सप्ताहात घडतील मानसन्मान अनपेक्षित लाभाची शक्‍यता. व्यवसायात आत्मविश्‍वास वाढेल. महत्वाचे करार-मदार होतील. मोठ्यांच्या सल्ल्याचा उपयोग कामात होईल. नोकरीत भेटी गाठीमुळे कामे होतील. मिळालेल्या संधीचा फायदा उठवाल. पैशाची चिंता मिटेल. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 9,10,11,12,13.

कन्या : प्रकृतीमान ठिक राहील
व्यवहारी धोरण ठेऊन कामांना प्राधान्य द्याल. फायदा मिळवून देणारी कामे हाती घेऊन उलाढाल वाढवाल. परिस्थितीवर मात करून प्रश्‍न मार्गी लावाल. नोकरीत विरोधकांवर मात कराल. कामाचे व आर्थिक नियोजन अचूक होईल. महत्वाचे पत्र व्यवहार होतील. कामा निमित्ताने प्रवास होईल. प्रकृतीमान ठिक राहील. काळजी घ्या.
शुभ दिनांक : 10,11,12,13,14,15.

तूळ : चांगली कामे होतील
मनशांती टिकवणे हे तुमच्या हातात आहे. तरी प्राणायाम व ध्यानधारणा करून शांत राहण्याचा प्रयत्न करावा. व्यवसायात नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील. हातून चांगली कामे होतील. पैशाच्या मोहापायी पाशापासून चार हात लांब राहणे उचित ठरेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. सामुहिक कामात प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दिनांक : 9,12,13,14,15.

वृश्‍चिक : कर्तव्य पूर्तीकडे लक्ष
माणसांची पारख या सप्ताहात तुम्हाला होईल. व्यवसायात विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील. कर्तव्य पूर्तीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. पैशाची उभारणी करावी लागेल. नोकरीत कामात वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल ही अपेक्षा फोल ठरेल. अति आत्मविश्‍वास टाळावा. महिलांनी झेपेल तेवढेच काम करावे.
शुभ दिनांक : 10,11,14,15.

धनु : आर्थिक प्रश्‍न संपेल
ग्रहमानाची साथ मिळेल, व्यवसायात नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. रेंगाळलेली कामे गती घेतील. प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत वेळेचा सदुपयोग कराल. जुनी येणी वसुल झाल्याने आर्थिक प्रश्‍न संपेल. नवीन खरेदी, पाहुण्यांची सरबराई मुलांच्या मागण्या, हट्ट, पुरवण्यात बरेच पैसे खर्च होतील. मानसिक समाधान मिळेल.
शुभ दिनांक : 9,12,13.

मकर : कामात यश मिळेल
व्यवसायात अशक्‍य वाटणाऱ्या कामात यश मिळवून दाखवाल. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामे हाती घ्याल. नोकरीत वरिष्ठ महत्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील. त्या निमित्ताने नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. घरात महिलांनी अनावश्‍यक खर्च टाळावेत. प्रकृतीमान थोडे नाजूक राहील. काळजी घ्यावी.
शुभ दिनांक :9,10,11,12,13,14,15.

कुंभ : कामाचे श्रेय मिळेल
अनपेक्षित फायदा देणाऱ्या घटना या सप्ताहात घडतील. व्यवसायात वसुलीचे प्रमाण वाढेल. पैशाची चिंता मिटेल. मनातील सुप्त बेत साकार होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांना मनःस्वास्थ्य उत्तम राखता येईल. घरगुती प्रश्‍न मार्गी लागतील. सुवार्ता कळेल. तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. सामूहिक कामात मान मिळेल.
शुभ दिनांक : 9,10,11,12,13.

मीन : नवीन कामे मिळतील
आरोग्य चांगले राहील. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे अनेक तऱ्हेने लाभ होईल. व्यवसायात प्रगती चांगली राहील. नवीन कामे मिळतील. पत टिकून राहील. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत परदेशगमन व पत्र व्यवहाराच्या कामांना गती येईल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. त्याचा उपयोग महत्वाचे निर्णय घेताना होईल.
शुभ दिनांक : 9,10,11,12,13,14,15.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)