उत्सुकता भविष्याची : 5 ते 11 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अनिता केळकर 

(लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 
मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू, तुळेत रवी, शुक्र वक्री, वृश्‍चिकेत बुध, गुरु, धनूमध्ये शनी, प्लुटो, मकरेत मंगळ व केतू तर कुंभेत नेपच्यून वक्री आहे. वरील ग्रहमान तुम्हाला उत्साही व चैतन्यमयी ठेवणारे आहे. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन काम फत्ते कराल. पैशाची चिंताही नसेल. नवीन कामे मिळतील. सकारात्मक वाटचाल राहील. आरोग्याची साथ लाभेल. 
सुवार्ता कळेल 
तुमच्यातला उत्साह ओसंडून वाहणारा राहील. व्यवसायात पुढाकार घेऊन हातातील कामे संपवाल. वेळेचे व पैशाचे गणित बरोबर जमवून नवीन कामे हाती घ्याल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. बदलीचे बेत कृतीत येतील. घरात सुवार्ता मन आनंदी करेल. तरुणांचे विवाह ठरतील. महिलांची मनोकामना पूर्ण होईल. आवडत्या व्यक्‍तीचा सहवास लाभेल.
शुभ दिनांक : 7,8,11

अनपेक्षित खर्च
तुमच्यातील रसिकतेला वाव मिळेल. ग्रहांची मर्जी तुमचेवर आहेच तेव्हा व्यवसायात योग्य व्यक्‍तीची मदत घेऊन कामांना गती द्या. लवचिक धोरण स्वीकारून परिस्थितीशी मिळतेजुळते घ्या. वरिष्ठांची व सहकाऱ्यांची आवश्‍यक तेथे मदत घ्या. परदेशव्यवहाराच्या कामात प्रगती होईल. अनपेक्षित खर्च होईल. घरात वादविवादाचे प्रसंग येतील. मौनव्रत ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 5, 6, 9, 10 

कामात उत्साह 
कामात कृतीशील राहून कामाची पूर्तता करावी लागेल. व्यवसायात कामात बदल करणे गरजेचे होईल. कार्यपद्धतीतही बदल करावा लागेल. सभोवताली सतर्क नगर ठेवून राहा. पैशाचा विनियोग योग्य तेथेच करा. नोकरीत कामात सुधारणा होईल.कामाची घडी नीट बसेल. जोडधंदा असणाऱ्यांना वरकमाई करता येईल. तुमचेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास करू नका. तरुणांनी काळजी चिंता करू नये.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 11 

नवीन खरेदीचे योग
नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात कामातील प्रगती चांगली होईल. व्यवसायातील विस्ताराच्या योजना कृतीत येतील. पैशाची सोय होईल. नोकरीत कामानिमित्ताने लांबच्या प्रवासाचे योग येतील नवीन ओळखी होतील. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची सुसंधी चालून येईल. बदल किंवा बदलीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येईल. जुने ठरलेले विवाह पार पडतील. नातेवाईक, आप्तेष्ट, यांच्या भेटीने आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9,10 

खर्च होईल 
मनातील बेत प्रत्यक्षात साकार झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. परंतु परिस्थितीनुरूप वागून व्यवसायात बदल करावे लागतील. फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घेऊन नफा मिळवाल. नोकरीत कामाचा कंटाळा येईल. वरिष्ठ नवीन कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवतील. त्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करावी लागेल. हटवादी स्वभावाचा इतरांना त्रास.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9, 10

अपेक्षित पत्रे येतील
 
ग्रहांची मर्जी तुमचेवर असल्याने नवीन चांगल्या संधी चालून येतील. व्यवसायात आर्थिक स्थिती समाधानकारक असेल परंतु कुसंगतीने पैशाचा हव्यास धरू नका. काही महत्वाचे करारमदार करावयाचे असल्यास वरिष्ठांच्या मदतीचा सल्ला घ्या. नोकरीत तणाव कमी होईल. सहकारी व वरिष्ठ आवश्‍यक वाटल्यास कामात मदत करतील. अपेक्षित पत्रे येतील. आनंदाची बातमी कळेल.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9, 10

सुसंधी चालून येईल 
सध्याचे ग्रहमान तुम्हाला नवचैतन्य देणारे आहे. व्यवसायात अवघड कामात यश खेचून आणाल. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. केलेल्या कामाचे श्रेय व कौतुक सर्वजण करतील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत सुसंधी चालून येईल. तुमच्या सल्ल्याचा विचार वरिष्ठ निर्णय घेताना करतील. घरात गृहसौख्याचा आनंद मिळेल. नवीन सहवास घडेल. तरुणांना मनपसंद सहकारी मिळेल.
शुभ दिनांक : 7, 8, 9, 10, 11

पैशाची तजवीज होईल
प्रयत्नाला नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पाठपुरावा कराल. सभोवतालच्या व्यक्‍तींकडून अपेक्षित साथ मिळेल. त्यामुळे उलाढाल वाढवाल. पैशाची तजवीज होईल नोकरीत नको त्या कामात बराच वेळ जाईल. कामाचा ताणही असेल पण वरिष्ठांची व सहकाऱ्यांची मदत मिळेल. घरात आनंददायक घटना घडतील. नवीन पर्वाची नांदी होईल. महिलांची स्वप्ने साकार होतील.
शुभ दिनांक : 5, 6, 9, 10, 11 

आर्थिक चिंता मिटेल
डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याचाच पाठपुरावा कराल. त्यातून काहीतरी चांगले घडेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन ठेवून घेतलेले निर्णय अचूक ठरतील. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित कराल. कार्यपद्धतीत बदल करून विस्तार करण्याचा बेत आखाल. नोकरीत एकाच वेळी अनेक कामे हाती घ्यावी लागतील. वेगळ्या कामात रस वाटेल. घरात निराशेचा सूर झटकून आशावाद जागृत करा.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 11

अनपेक्षित खर्च
जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनच वेगळा असतो. त्यामुळे कर्तव्यास प्राधान्य द्याल. व्यवसायात कामाचा उरक असेल पण समाधान नसेल. पैशाची फारशी चिंता नसेल. अपेक्षित येणी येतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. ज्यामुळे कामाचे स्वातंत्र्य राहील. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. चाकोरीबाहेर जाऊन काही कामे कराल व यशही मिळवाल. अनपेक्षित खर्च होतील. कौटुंबिक स्वास्थ्याचा आनंद मिळेल.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9, 10 

परदेशगमनाची संधी
शनीप्रधान तुम्ही बराच काळ वाट पाहता आणि संधी मिळताच त्याचा लाभ घेता त्यामुळे यश हमखास मिळतेच. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:मध्ये बदल करावा लागेल. नवीन आधुनिक गोष्टी शिकून त्यात रस घ्याल व उलाढाल वाढविण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत नवीन कामे डोळ्यासमोर असतील त्यामुळे स्वस्थता नसेल. घरात ताणतणाव कमी होतील. व्यक्‍तींच्या विचित्र वागण्याने अचंबीत व्हाल
शुभ दिनांक : 7, 8, 9, 10, 11

सुवार्ता कळेल
तुमची गोंधळाची स्थिती असली तरी सबुरी ठेवा. महत्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्या. व्यवसायात कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न राहील. नवीन ओळखीचा उपयोग होईल. नोकरीत कामात अडथळे येतील. त्यामुळे काम करणे कठीण जाईल. घरात सर्वांशी तडजोडीने राहावे लागेल. गैरसमजुतीने होणारे वाद टाळावेत.
शुभ दिनांक : 5, 6, 9, 10, 11
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)