उत्सुकता भविष्याची…(3 ते 9 सप्टेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे) 

अनिता केळकर 
(लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 
मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू, सिंहेत रवी, बुध, तुळेत गुरु व शुक्र, धनू मध्ये शक्‍ती व प्लुटो वक्री , मकरेत मंगळ व केतू तर कुंभेत नेपच्यून वक्री आहे. सप्ताहात कामात येणाऱ्या अडीअडचणींवर मात करून पुढे जाल. पैशाचे व्यवहार करताना दक्ष राहावे लागेल. नवीन कामे स्वीकारताना चोखंदळ राहावे लागेल. प्रकृतीकडे वेळीच लक्ष द्या. 
मेष: प्रकृतीकडे लक्ष द्यावे 
कामामध्ये जरी अडचणी आल्या तरी त्यावर मात केल्याशिवाय यश मिळणार नाही. हातामध्ये मिळणाऱ्या पैशाचे गणित मागे पुढे झाल्यामुळे काही बेत पुढे ढकलावे लागतील. प्रतिस्पर्ध्यावर नजर ठेवा. नोकरीमध्ये आपले काम पडताळून पाहून मगच ते वरिष्ठांपुढे ठेवावे. घरामध्ये स्वत:पेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य द्याल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक : 3, 4, 5, 6, 7, 8. 9
वृषभ: पैशाची तरतूद करा 
तुम्हास हवी तशी गती कोणत्याच कामात येत नसल्याने तुम्ही सध्या मनावर संयम ठेवणे गरजेचे आहे. धंदा व्यवसायात कामांना चालना देण्यासाठी निश्‍चित निर्णय घेऊन कामाला लागा. नोकरीत वेगळे काम करण्याची इच्छा साकार होईल पण तुमच्या कामात सावधगिरी व गुप्तता पाळा. घरात शुभसमारंभ पार पडतील, सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 3, 5, 5, 6, 7, 8, 9
मिथुन: मुलांकडून सुवार्ता 
महत्त्वाचे ग्रह मनावर फुंकर घालणारे आहेत. ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण झाला होता तो आता कमी होईल. जीवनामध्ये वेगळेपण अनुभवण्याची इच्छा निर्माण होईल. कर्ज मंजूर होण्यासाठी लक्ष ठेवा. नोकरीत वरिष्ठांपुढे जाताना त्यांच्या मूडचा विचार करा. जागा वा वाहन खरेदीला चांगला सप्ताह आहे. मुलांकडून सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9
कर्क: परदेश प्रवासाचे बेत 
सध्या थोडा तणाव कमी झाल्याने स्वास्थ्य अनुभवावेसे वाटेल. तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राकडे लक्ष देऊ शकाल. धंदा व्यवसायात कामे ओळखीच्या व्यक्‍तींच्या भेटीगाठीने मार्गी लावा. नोकरीमध्ये सहकारी मित्रांचे बोलणे, वागणे खिलाडूपणाने घ्या. घरात किरकोळ कारणाने खटके उडाले तरी ते निवळतील. परदेश प्रवासाचे बेत ठरतील.
शुभ दिनांक : 3, 4, 7, 8, 9
सिंह: चांगल्या घटना 
या सप्ताहात तुमच्यातील सुप्त कलागुणांना दिशा मिळाल्याने तुम्ही उल्हसित व्हाल. धंदा व्यवसायात भांडवलाची गरज असेल तर ती भागू शकेल. उत्पन्न वाढविण्यासाठी जोडधंद्याचा विचार मनात डोकवेल. परदेशगमनाचा विचार असेल तर तो मानस पुरा होईल. तरुणांना मनपसंद जीवनसाथी निवडता येईल. नवीन जागा खरेदीचे बेत पार पडतील.
शुभ दिनांक : 3, 4, 5, 6, 9
कन्या: ताणतणाव कमी होईल 
ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल. एकेक गोष्ट मनासारखी घडत जाऊन तुमचा आनंद द्विगुणीत होईल. जुनी येणी वसुलीस प्राधान्य द्या. नोकरीत वातावरणामध्ये सुधारणा होईल. कामातील बदल तुम्हाला ताजेतवाना बनवेल. घरात एखाद्या व्यक्‍तीच्या जीवनातील आनंदाचा प्रसंग साजरा होईल. व्यक्‍तीगत जीवनात ताणतणाव कमी होतील.
शुभ दिनांक : 3, 4, 5, 6, 7, 8, 9
तूळ: नवीन कामे मिळतील 
तुमच्या मुत्सद्दीपणाला वाव मिळेल. तुमच्या प्रश्‍नांवर मार्ग निघेल. रोजची कामे नेहमीसारखी झाल्याने कामाचा नवा उत्साह तुमच्यामध्ये उत्साह सळसळेल. कामाकरिता प्रयत्नांच पराकाष्ठा करा म्हणजे नवीन कामे मिळतील. घरातील प्रश्‍नांवर तोडगा शोधण्यासाठी ज्येष्ठ व्यक्‍तींचा सल्ला घ्या. सामूहिक कामात सहभागी व्हाल.
शुभ दिनांक : 5, 6, 7, 8, 9
वृश्‍चिक: प्रगती समाधानकारक 
या सप्ताहात पैशाची चिंता कमी झाल्याने थोडेसे स्वस्थ व शांत व्हाल. धंदा व्यवसायात प्रगती समाधानकारक राहील. कामातील दर्जा व गुणवत्ता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार कराल. आवश्‍यकता वाटल्यास बदल करा. चालू नोकरीत कामानिमित्त जादा सुखसुविधा मिळतील. तरुणांचे विवाह जमतील. घरात आवडीची वस्तू खरेदी कराल.
शुभ दिनांक : 3, 4, 7, 8, 9
धनु: विरंगुळा लाभेल 
ग्रहांची साथ लाभेल. पूर्वीच्या अनुभवाचा उपयोग एक नवीन वेगळी दिशा मिळण्यात होईल. धंदा व्यवसायात कल्पना साकार होण्यासाठी पूरक घटना घडतील. आजूबाजूच्या व्यक्‍तींच्या तुमच्याकडून नक्‍की काय अपेक्षा आहेत ते समजून घ्या. घरातील किंवा जवळच्या व्यक्‍तींमुळे विरंगुळा लाभेल. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 5, 6. 9
मकर: कामाचा वेग वाढेल 
महत्त्वाच्या ग्रहांची मर्जी तुमचेवर आहे. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा करणाऱ्या घटना घडतील. तुमच्या इच्छा आंकाक्षांना धुमारे फुटतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही आत्मविश्‍वासाने वावराल. नोकरीत नव्या संधीकरिता तुमची निवड होईल. लहानमोठ्या फायद्यामुळे कामाचा वेग वाढेल. घरात शुभकार्ये घडतील.
शुभ दिनांक : 3, 4, 7, 8
कुंभ: आत्मविश्‍वास वाढेल 
या सप्ताहात सर्व आघाड्यांवर सतर्क राहावे लागेल. धंदा व्यवसायात धोका पत्करून कोणतेही नवे काम हातात घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. नोकरीत आपले काम बरे की आपण हे धोरण ठेवा. घरात सामोपचाराची भूमिका ठेवा. तुम्हाला मदत करणाऱ्या व्यक्‍तींना सांभाळून घ्या. प्रकृतीकडे लक्ष ठेवा. तुम्या क्षेत्रातील राजकारणापासून लांब राहा.
शुभ दिनांक : 3, 4, 5, 6, 9
मीन: लवचिक धोरण ठेवा 
तुमची प्रगती व यश हे तुम्हाला मिळणाऱ्या सहकाऱ्यांवर अवलंबून आहे. धंदा व्यवसायात महत्त्वाचे करार किंवा सौदे एक दोन आठवडे पुढे ढकला नाही तर फसगत होईल. नोकरीत जोखमीचे काम स्वत:च हाताळा. घरात मित्र मैत्रिणी व नातेवाईक यांचेपासून चार हात लांब राहणे चांगले. मनन व चिंतन करून मन:स्वास्थ्य जपा.
शुभ दिनांक : 3, 4, 5, 6, 7, 8, 9

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)