उत्सुकता भविष्याची : 29 ऑक्‍टोबर ते 4 नोव्हेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

अनिता केळकर 

(लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 
लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात राहू, सप्तमात रवी, शुक्र वक्री, अष्टमात गुरू, बुध, भाग्यात शनी, प्लुटो दशमात मंगळ, केतू तर लाभात नेप्च्यून वक्री आहे. व्यवसायात सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील. महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करणे हे आव्हान असेल. वरिष्ठांची मर्जी मात्र असेल त्यामुळे आत्मविश्‍वास बळावेल. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. 
प्रवासाचे योग 
व्यवसायात नोकरीत जरा जपून पावले उचला. महत्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला अवश्‍य घ्या. तापट स्वभावाला आळा घाला. अनावश्‍यक खर्च टाळा. नोकरदारांना कामानिमित्ताने दूरच्या प्रवासाचे योग येतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल. महिलांचा नको त्या कामात वेळ जाईल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांनी कंबर कसून अभ्यासाला लागावे.
 शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2, 3 

सुवार्ता कळेल 
अनेक महत्वाकांक्षा उफाळून येतील. महत्वाच्या कामांना प्राधान्य द्याल. व्यवसायात बदल करण्याचे बेत मनात घोळतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत नवी जबाबदारी पेलाल. वरिष्ठांचा मूड सांभाळणे गरजेचे होईल. नवीन मार्ग सापडतील. महिलांचा वेळ गृहसजावटीत जाईल. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासापेक्षा खेळण्याकडेच लक्ष राहील. तरुणांचे विवाह ठरतील.
 शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2, 3, 4 

आत्मविश्‍वास वाढेल 
ओळखीचा उपयोग होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. मानसिक समाधान लाभेल. पैसा मिळाला तरी खर्चही तसाच राहील. अनावश्‍यक खर्च टाळा. व्यवसायात केलेल्या कष्टाचे चीज होईल. नोकरदारांच्या हातून उत्तम कामगिरी होईल. तरी हुरळून जाऊ नका. राजकारणी व्यक्ती, खेळाडू, कलावंतांना प्रसिद्धी मिळेल. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2, 3, 

आर्थिक लाभ
व्यवसायात आलेल्या अडचणींवर मात करून यश संपादन कराल. कामाचा व्याप वाढेल त्यामुळे दगदग धावपळही वाढेल. नोकरीत नको तेथे औदार्य दाखवाल व न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्याल. संयम राखा. स्त्रीकडून आर्थिक लाभ संभवतात. अनावश्‍यक खर्च टाळा. भावंडाचे सुख उत्तम राहील. महिलांना संततीबाबत थोडी विवंचना राहील. विद्यार्थ्यांनी चिकाटीने ज्ञानार्जन करावे.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4 

इच्छा सफल होतील
घेतलेले निर्णय अचुक व फायदा मिळवून देतील. व्यवसाय वाढीसाठी विशेष जागरूक राहाल. खेळत्या भांडवलाची सोय होईल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार होतील. नोकरीत बोलण्यातून फायदा संभवतो. बेकारांना नोकरी मिळेल. महिलांवर घरात सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव होईल. त्यामुळे केलेल्या कष्टाचे सार्थक होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला उत्तम ग्रहमान.
शुभ दिनांक : 29, 30, 2, 3, 4

आवडीची खरेदी 
अंगातील कलागुण दाखविण्याची उत्तम संधी मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन करू शकाल. व्यवसायात महत्वाचे निर्णय घ्याल. यशाची कमान वाढत जाईल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी तुमचेवर राहील. जादा अधिकार व सवलती मिळतील. महिलांना नवीन वस्तूंचे आकर्षण वाटेल. नवीन खरेदी कराल. तरुणांना विवाहास योग्य जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2,3

प्रवास घडेल
खाण्यापिण्याचे बरेच चोचले राहतील. स्वभाव थोडा हट्टी, हेकेखोर राहील. व्यवसायात महत्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवाल. कामाचे वेळी काम इतर वेळी आराम असा खाक्‍या राहील. नोकरीत कंटाळवाणे काम संपवून मनासारखे काम करण्याचा आनंद मिळेल. प्रवास घडेल. नवे मित्र जोडाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे मनन व चिंतन करावे.
शुभ दिनांक : 29, 30, 31, 1, 2,3 

खर्चावर नियंत्रण ठेवा
व्यवसायात नोकरीत भरपूर काम करावे लागले तरी वरिष्ठांना त्याची जाणीव करून द्या. जादा पैसे मिळवण्यासाठी कष्टही खूप करावे लागतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. अपेक्षित पत्र्यव्यवहारांना चालना मिळेल. मित्रांवर जास्त विसंबून न राहणेच चांगले. अनावश्‍यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. महिलांचे विचार इतर लोकांना पटणार नाही तरी न रागवता डोके शांत ठेवावे.
शुभ दिनांक : 31, 1, 2, 3, 4 

सुवार्ता कळेल
महत्वाचे ग्रह साथ देणारे अहेत. तरी मोठ्या उमेदीने कामाला लागा. व्यवसायात नवीन कामे मिळतील. अर्धवट रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. तुमचे व तुमच्या कामाचे महत्व इतरांना कळून येईल. फार विसंबूर राहू नका. महिलांना वैयक्‍तिक सौख्य चांगले मिळेल. घरात वातावरण प्रसन्न राहील. सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना अनुकुल ग्रहमान.
शुभ दिनांक : 29, 30, 2, 3, 4 

फायदा होईल
व्यवसाय धंद्यात पूर्वी केलेल्या कामातून बराच फायदा होईल. घेतलेले निर्णय अचूक ठरतील. पैशाची आवक सुधारेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल. सहकारी व वरिष्ठ कामात मदत करतील ही अपेक्षा ठेवू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध जोडले जातील. महिला प्रियजन आप्तेष्ट यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तरुणांना मनपसंद जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 31, 1, 4

विशेष कमाई
धाडसी पावले उचलाल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रयत्नाशील राहाल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. नोकरदारांना वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागेल. मनाविरुद्ध कामे करावी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे. महिलांनी विनाकारण होणारी दगदग धावपळ कमी करावी. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करावा.
शुभ दिनांक : 29, 30, 2, 3

खरेदीचे बेत ठरतील
सध्या नशिबाची साथ लाभल्याने पैशाची चिंता नसेल. मनाप्रमाणे स्वच्छंदीपणे वागाल व खर्च कराल. व्यवसायात प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. हितचिंतकांच्या मदतीने नवीन कामे मिळतील. नोकरदारांना वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे उरकावी लागतील. केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. प्रवास घडेल. घरात नवीन खरेदीचे बेत ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान आहे.
शुभ दिनांक : 29,30, 31, 1, 4‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)