उत्सुकता भविष्याची : 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात रवी, गुरु व बुध वक्री, नवमात शनी व प्लुटो, दशमात केतू तर लाभात मंगळ व नेप्चून आहे. तुमच्या उत्साही स्वभावाला पूरक ग्रहमान लाभेल. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी कामात थोडा बदल करणे गरजेचे होईल. महत्त्वाची कामे वरिष्ठ तुमचेवर सोपवतील. परंतु यश मिळवून त्यांचा विश्वास संपादन कराल. 


जोडधंद्यात कमाई होईल

तुमच्या आंनदी व उत्साही स्वभावाला खतपाणी घालणारे ग्रहमान आहे. व्यवसायात कार्यपद्धतीत बदल घडवून कामांना वेग आणाल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत अवघड कामाची जबाबदारी तुमचेवर येईल. वरिष्ठ तुमची एकप्रकारची सत्व परिक्षाच घेतील. परंतु त्यातही यशस्वी व्हाल. जोडधंद्यातून कमाई होईल. घरात वातावरण आनंदी राहील.
प्रियजनांचा सहवास मिळेल.
शुभ दिनांक : 26, 27, 28, 29, 30, 1. 

प्रवासयोग येतील 

ग्रहसौख्याचा आनंद देणारे ग्रहमान. मनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकार होतील. व्यवसायात विनाकारण होणारी दगदग, धावपळ कमी होईल. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल. प्रवासयोग येतील आर्थिक चिंता मिटेल. घरात सुवार्ता कळेल. प्रकृतीमान सुधारेल. मुलांच्या हट्टासाठी खर्चही होईल.
शुभ दिनांक : 26, 27, 28, 29, 30, 1, 2. 

कष्टाचे चीज होईल 

तुमच्या बुद्धीचातुर्याचा लाभ तुम्हाला होईल. अनपेक्षित मानसन्मान व मोठे पद भूषवाल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. व्यवसायात चांगली कामगिरी हातून घडेल. वेळेत कामे पूर्ण होतील. समाधान मिळेल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ व सहकारी कामाची दाद देतील. पैशाची आवक वाढेल. घरात कौशल्याला वाव मिळेल. शुभकार्ये ठरतील. खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल. मनोबल वाढेल.
शुभ दिनांक : 26, 27, 28, 29, 30, 1, 2. 

उत्साह राहील 

भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्याल. व्यवसायात महत्त्वाची कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण कराल. पैशाची तात्पुरती सोय होईल. जोडधंद्यातून फायदा मिळेल. ओळखीतून नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत उत्साह वाढवणारी कामगिरी वाट्याला येईल. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. पैशाचे व्यवहारात दक्ष रहा. तडजोडीने वागलात तर गैरसमज मिटतील.
शुभ दिनांक : 27, 28, 29, 30, 1, 2. 

गुणांचे चीज होईल 

ग्रहांची अनुकूलता तुम्हाला कामात सक्रिय बनवेल. नवीन काहीतरी घडवण्यासाठी विशेष प्रयत्नशील रहाल. तुमच्यातील धडाडी व उत्साह वाखाणण्याजोगी राहील. व्यवसायात कामातील कौशल्य दाखवून स्वत:ची प्रतिमा निर्माण कराल. मनातील योजना प्रत्यक्षात साकार होतील. नोकरीत तुमच्या गुणांचे चीज होईल. एखादी संधी चालून येईल त्याचा लाभ घ्या. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.
शुभ दिनांक : 26, 30,1, 2. 

नोकरीत नवीन काम 

अनपेक्षित मोठ्या खर्चाची नांदी होईल. परंतू तो खर्च चांगल्या कामासाठी असल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यवसायात ध्येय धोरणे ठरवून त्याप्रमाणे कृती करल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करून पैशाची जमवाजमव कराल. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. नोकरीत नवीन वर्तुळात काम करण्याचा आनंद मिळेल. बदल व बदलीची शक्‍यता. जोडधंद्यातून लाभ मिळेल. बेकार व्यक्‍तिंना नवी नोकरी मिळेल.
शुभ दिनांक : 26, 27, 28, 29, 2. 

संधीचा योग्य लाभ 

सध्या तुमची कळतं पण वळत नाही अशी अवस्था आहे तरी थोडे सबुरीचे धोरण ठेवा. व्यवसायात येणाऱ्या संधीचा योग्य तो लाभ करून घेतलात तर बरेच काही मिळवाल. योग्य व्यक्‍तिंची मदत कामात घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या सल्ल्याचा मान राखा. मनाविरूद्ध वागावे लागेल तरी शांत रहा. शब्द हे शस्त्र आहे लक्षात ठेवा. घरात वादविवाद टाळा. दगदग धावपळ कमी कराल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 26, 27, 28, 29, 30, 1. 

गुंतवणूक कराल

चिकाटी व धैर्य या गुणांच्या जोरावर कामात बाजी माराल. व्यवसायात वारा वाहिल तशी पाठ फिरवण्याचे तंत्र अवलंबलेत तर उपयोग होईल. हातातोंडाशी आलेली कामे गती घेतील. पैशाची स्थिती समाधानकारक असेल त्यामुळे छोटी गुंतवणूकही करू शकाल. नोकरीत स्वत:च्या मर्यादा ओळखून कामे करा. कठीण कामाची जबाबदारी तुमचेवर सोपवून वरिष्ठ निश्‍चिंत होतील.
शुभ दिनांक : 27, 28, 29, 30, 1, 2.

कामे मार्गी लागतील 

तुमच्या धाडसी वृत्तीला खतपाणी घालणारे ग्रहमान. व्यवसायात नवीन कामांना गती येईल. आवश्‍यक ते सहकार्य मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. जुनी रेंगाळलेली कामेही मार्गी लागतील. पैशाची तजवीज होईल. नोकरीत तुमच्या कौशल्याला वाव मिळेल. वरिष्ठ कामासाठी जादा सुविधा देतील. सहकारी कामात मदतीचा हात देतील. घरात नवीन खरेदीचे बेत ठरवाल. शुभ कार्ये ठरतील. प्रकृतीमान सुधारेल.
शुभ दिनांक : 26, 30,1, 2. 

शक्‍तीपेक्षा युक्‍ती श्रेष्ठ 

सतत पुढे जाण्यासाठी चालणारी धडपड यशस्वी होईल, कोणत्याही परिस्थितीत न डगमगता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घ्याल. व्यवसायात शक्‍तीपेक्षा युक्‍ती श्रेष्ठ हे लक्षात ठेवून निर्णय घ्याल. कार्यपद्धतीत बदल घडवून नवीन योजना कार्यान्वित करण्याचा मानस राहील. नोकरीत वरिष्ठांची चांगले संबंध ठेवलेत तर ते तुमच्या अडचणींचा विचार करतील व सहकार्यही देतील. कृतीला सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक : 27, 28, 29, 2. 

विवाह योग 

तुमच्या मार्गातील अडथळे हळुहळू दूर झाल्याने तुमचा हुरुप वाढेल. व्यवसायात नवीन कल्पना अंमलांत आणाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य राहील. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत सहकाऱ्यांवर फार मोठी भिस्त ठेवू नका. पूर्वी हातून निसटलेली संधी पुन्हा मिळेल. लाभ घ्या. घरात तरुणांना विवाहास योग्य साथीदार मिळेल. गैरसजम दूर झाल्याने गढूळ वातावरण निवळेल.
शुभ दिनांक : 26, 30, 1.

प्रयत्नांती परमेश्वर

खर्चावर नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. गढूळ परिस्थिती निवळल्याने मनाला हायसे वाटेल. व्यवसायात “प्रयत्नांती परमेश्वर’ हे लक्षात ठेवा व कामे करा. कामात धोका न पत्करता जे मिळेल त्यात समाधान माना. नोकरीत वास्तववादी दृष्टीकोन ठेवा. आळस झटकून वेळेत कामे पूर्ण करा. चांगली बातमी कानावर येईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. एकाग्रता मन:शांती मिळेल.
शुभ दिनांक : 27, 28, 29, 2.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)