उत्सुकता भविष्याची : 24 ते 30 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात गुरु, बुध, भाग्यात रवी, शनी, प्लुटो, दशमात केतू तर लाभात नेप्च्यून व व्ययात मंगळ आहे. विचार व कृती यांचा समन्वय साधून कामाचे नियोजन करा. प्रयत्नाने मनातील बेत प्रत्यक्षात साकार करता येतील. पैशाची उब मिळेल. अतिविश्‍वास नको. दगदग धावपळ कमी करावी. 

चिंता वाढेल 

प्रत्येक कामाचा शांतपणे विचार करून त्याप्रमाणे कृती करा. मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. पैशाचे व्यवहारात चोखंदळ राहा. नोकरीत महत्वाचे निर्णयात वरिष्ठांचा सल्ला घ्या. छोटया मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होण्याची शक्‍यता. तरी डोके शांत ठेवा. घरात जुन्या नव्या प्रश्‍नांमुळे चिंता वाढेल. प्रकृतीमान नाजूक राहील तरी काळजी घ्या.
शुभ दिनांक : 24, 25,26, 27, 28. 

शुभसमारंभ ठरतील

वेळेचे व कामाचे योग्य नियोजन केलेत तर रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नवीन कामे ओळखीतून मिळतील. व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. नोकरीत आपले काम बरे की आपण बरे हे धोरण उपयोगी पडेल. घरात शुभसमारंभ ठरतील. नवीन खरेदीचे योग येतील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 27, 29, 30. 

अनावश्‍यक खर्च 

पैशाचे गणित मांडून काम स्वीकारा. अंथरुण पाहून पाय पसरा. नवीन कामासाठी खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. बॅंका व हितचिंतकांची मदत या कामी होईल. नोकरीत बदल करण्याचा विचार मनात येईल. परंतु थोडा धीर धरा. वरिष्ठांना तुमचे व तुमच्या कामाचे महत्व कळून येईल व त्यांचे विचारात बदल होईल. घरात अनावश्‍यक खर्च वाढेल. तरुणांचे विवाह ठरतील. मुलांकडून सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 24,25,26,27,28,29,30. 

चांगली घटना घडेल 

भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती करा. व्यवसायात अडथळे कमी झाल्याने जिद्दीने कामाला लागा. पैशाची वसुली मनाप्रमाणे होईल. नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील व आश्‍वासने पूर्ण करतील. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. घरात एखादा छोटासा समारंभ पार पडेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत आखाल. व्यक्‍तीगत जीवनात चांगली घटना घडेल. सामूहिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28, 29. 

वातावरण आनंदी 

मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. व्ववसायात कामाच्या नवीन संधी चालून येतील. मात्र कुठलेही काम स्वीकारताना त्यातील अडीअडचणींचा विचार करा. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रीत करा. वरिष्ठांच्या मर्जीत राहून काम करा. वास्तववादी दृष्टीकोन ठेवा. घरात वातावरण आनंदी राहील. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील. तरुणांना मनपसंद जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 24, 27, 28, 29, 30 

पैशाची चिंता मिटेल 

उमेद व उत्साह वाढवणारे ग्रहमान लाभल्याने कामांना स्फूर्ती येईल. व्यवसायात कामातील प्रगतीसाठी चाकोरीबाहेरील जाऊन वेगळ्या पद्धतीचा अवलंब कराल. निश्‍चित यशाच्या दिशेने पावले टाकाल. वरिष्ठ आपलाच हट्ट पुरा करतील. त्यांच्या तंत्राने वागून कामे करावी लागतील. कामानिमित्ताने प्रवास व नवीन ओळखी होतील. घरात इतर व्यक्‍तींच्या आपमतलबी स्वभावाचा राग येईल.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 29, 30 

मानसिक समाधान 

अवघड व अशक्‍य वाटणारी कामे झपाट्याने पार पडतील व सोपी कामे रेंगाळतील. अनपेक्षित कामात सुधारणा झाल्याने तुम्हालाही आश्‍चर्य वाटेल. व्यवसायात कामाचे महत्व वाढेल. योग्य वेळी मिळालेली योग्य संगत बरेच काही मिळवून देईल. नोकरीत कामातील बेत गुप्त ठेवा. सहकारी व वरिष्ठांकडून मदतीची अपेक्षा नको. घरात पाहुण्यांची सरबराई करावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. समारंभात सहभागी व्हाल.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 27, 28

दगदग कमी करा

इर्षा जागृत करणारे ग्रहमान. व्यवसायात प्रत्येक कामात यश संपादन करण्यासाठी यश मिळेल. पैशाची स्थितीही समाधानकारक राहील. नोकरीत कामात चोख राहा. माणसांची पारख करण्यात गल्लत करू नका. परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. बेकार व्यक्‍तींना नवीन कामाची संधी दृष्टीक्षेपात येईल. घरात कामाचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे कामे सोपवा. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल.
शुभ दिनांक : 25, 26, 27,28 

वेळ मजेत जाईल 

परिस्थितीनुरूप कार्यपद्धतीत बदल करून कामात सतर्क राहा. अतिविश्‍वास टाळा. व्यवसायात हातातोंडाशी आलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. आवश्‍यक वाटल्यास महत्वाच्या व्यक्‍तींचा सल्ला घ्या. नोकरीत कामात शिथिलता येऊ देऊ नका. वरिष्ठ वेगळ्या पद्धतीच्या कामासाठी तुमची निवड करतील. त्यासाठी जादा सवलती व अधिकारही देतील. मात्र गैरफायदा घेऊ नका.
शुभ दिनांक : 24, 27, 28, 29, 30. 

यश संपादन कराल 

बुद्धीचातुर्याच्या जोरावर इतरांवर छाप पाडाल. कामात यश संपादन कराल. व्यवसायात कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा राहील. विचारांना कृतीची जोड मिळाल्याने यशाची कमान उंचावेल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. मात्र त्यांचेपासून चार हात लांब राहणेचे इष्ट ठरेल. विचारल्या खेरीज सल्ला देणे महागात जाईल. घरात खर्चाचे प्रमाण  वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील. वेळ मजेत जाईल.

शुभ दिनांक : 25, 26, 29, 30. 

पैशाची चणचण 

सभोवतालच्या व्यक्‍तींची मने सांभाळून कृती करा. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहा. काही कारणाने आखलेले बेत बदलावे लागतील. पैशाची चणचण भासेल तरी न चिडता सर्वांशी प्रेमाने बोला. पैशामुळे हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतील. सहकारी व वरिष्ठ यांना तुमची किंमत कळून येईल. कामापुरता मामा या म्हणीची आठवण होईल.
शुभ दिनांक : 24, 27, 28. 

आर्थिक चिंता मिटेल 

पैशाची उब मिळाल्याने सभोवतालच्या वेगवेगळ्या व्यक्‍तींचा वावर वाढेल. माणसांची खरी पारख करावी लागेल. व्यवहार दक्ष राहून कामे उरका. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढतील काम करून घेतील पण वाच्यता करणार नाहीत त्यामुळे चिडचिड होईल. आर्थिक चिंता मिटेल. आप्तेष्टांच्या भेटीने आनंद मिळेल. मानसिक समाधान मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.
शुभ दिनांक : 24, 25, 26, 29, 30. 

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)