उत्सुकता भविष्याची : 22 ते 28 ऑक्‍टोबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे 

अनिता केळकर 
(लेखिका – ज्योतिषतज्ज्ञ) 
मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू, तुळेत रवी, शुक्र वक्री, वृश्‍चिकेत गुरू व बुध 27 तारखेला येत आहे. धनूमध्ये शनी, प्लुटो, मकरेत मंगळ, केतू तर कुंभेत नेपच्यून वक्री आहे. मनाची एकाग्रता जेवढी ठेवाल तेवढा तुमचाच फायदा होईल. व्यवसायात यश कीर्ती वाढेल. निर्णय अचूक ठरतील. तब्येतीची थोडी किरकर राहील, काळजी घ्या, करू नका. पैशाची उब जाणवेल 
यशाचे प्रमाण वाढेल 
प्रत्येक गोष्टीत तुम्हाला घाई असते तुम्ही तुमच्या प्रयत्नात जेवढी सातत्यता ठेवाल तेवढे तुमचे यशाचे प्रमाण वाढेल. धंदा व्यवसायात पूर्वी घेतलेला निर्णय योग्यच होता याचा प्रत्यय तुम्हाला येईल. नोकरीत तुम्ही तुमचे कामाचे उद्दिष्ट गाठू शकाल. तुमच्या कामात युक्‍तीचा व धाडसाचा उपयोग होईल. घरात मीपणाला महत्व देऊ नका. प्रकतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 28 

वातावरण आनंदी 
यश नजरेच्या टप्प्यात आल्याने तुम्हाला काम करायला स्फूर्ती येईल. जिद्द व चिकाटी मात्र सोडू नका. धंदा व्यवसायात दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक केली असेल तर ती योग्यच होती याचा प्रत्यय येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची योग्य ती दखल घेतील. घरात चांगल्या घटनेमुळे उत्साही वातावरण राहील. खेळाडूंना आपले नैपुण्य सिद्ध करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील.
शुभ दिनांक : 22, 23, 24,27, 28 

आत्मविश्‍वास वाढेल 
विचार व कृती अंमलात आणून मनातील इच्छा ताबडतोब पूर्ण करण्याची घाई असेल. धंदा व्यवसायात कठीण वाटणारी कामे धसास लावण्यात यशस्वी व्हाल. आवश्‍यक त्या पैशाची सोय झाल्याने तुमच्यातील आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार काम केल्याने ते खुश असतील. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. घरात भविष्यातील एखाद्या कार्यक्रमाचे बेत ठरतील.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26


कामधंदा मिळेल 
नेहमीच्या कामाबरोबर तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याचा आनंद मिळवाल. व्यवसायात वाढ होण्याच्या उद्देशाने नव्या ओळखी होतील. काम करून लक्षणीय यश व फायदा मिळवायचा तुमचा मानस असेल. परदेशात व्यवहारात चांगली बातमी कळेल. बेकार व्यक्‍तींना कामधंदा मिळेल.घर सजावटीसाठी तयारी कराल. तरुणांना मनपसंत व्यक्‍तीशी गाठीभेटीचा योग येईल.

शुभ दिनांक : 22 , 23, 24, 


इच्छा सफल होतील 
तुमच्या कल्पकनेतेन काम करण्याने तुमच्या यशात वाढ होईल. स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. धंदा व्यवसायात नवीन युक्‍ती योजून उलाढाल वाढवाल. हितचिंतकाची मदत होऊन आर्थिक आघाडीवर तुम्ही विश्‍वासाने पुढे जाल. जोडधंदा असणाऱ्यांना पूर्वीच्या कामाचे पैसे हातात पडतील. घरात तुम्ही ठरवलेल्या तरुणांच्या इच्छा सफल होतील.

शुभ दिनांक : 25, 26, 27, 28 


आवडीची खरेदी 
ज्या कामात काही घडतच नाही अशा कामांना आता तुमच्या दृष्टीने महत्व असेल. ती कामे पूर्ण करण्याच्या मागे लागा म्हणजे त्याचा फायदा पुढील दोन आठवडयात दिसेल. धंदा व्यवसायात नवनवीन कल्पना साकार करण्यासाठी भांडवलाची तरतूद करावी लागेल. नोकरीत कामामध्ये बदल किंवा बदली हवी असेल तर तसे प्रयत्न करायला हरकत नाही.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 27, 28 


अपेक्षित बातमी कळेल 
समोर यशाचे शिखर दिसत असताना थोडा धीर धरणे आवश्‍यक ठरेल. युक्‍तीने व निश्‍चयाने काम करीत राहिलात तर तुमचा त्रास कमी होईल. महत्वाची कामे हातावेगळी करण्यासाठी योग्य व्यक्‍तींचा उपयोग करून घ्या. धंदा व्यवसायात नवीन पद्धतीचा अवलंब कराल. नोकरीत कितीही काम केले तरी अपुरेच वाटेल. घरात अनपेक्षित खर्च वाढेल.

शुभ दिनांक : 25, 26


शुभसमारंभ पार पडेल 
पैशाच्या कामांना या सप्ताहात महत्व द्याल. कामाचा दर्जा व गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी जादा भांडवलाची तरतूद करावी लागेल. प्रसिद्धी व जनसंपर्काचे नवे तंत्र आत्मसात कराल. नोकरीत तुमच्या गुणांची कदर करणारे काम वरिष्ठ तुमचेवर सोपवतील. त्यामुळे तुमचा भाव वधारेल. तरुणांना भुरळ पाडणाऱ्या व्यक्‍तींची साथ लाभेल. खेळाडू, कलाकारांना प्रसिद्ध मिळेल.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 27, 28 


चांगली संधी मिळेल 
एखादी भव्यदिव्य कल्पना तुम्हाला दंग ठेवेल. त्यातील खाचखळग्यांच प्रथम विचार करा. धंदा व्यवसायात लाभदायक सप्ताह जाईल. बॅंका व वित्तीय संस्था यांच्याकडून अर्थसहाय्य होईल. नोकरीत जरी कामाचा ताण वाढला तरी भविष्यातील एखादी चांगली संधी तुमच्या वाट्याला येईल. नवीन जागा घेण्याचा विचार असेल तर त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यापूर्वी कायदेशीर बाबी लक्षात घ्या.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26 


मंगलकार्य ठरेल 
एखाद्या संधीचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे तुम्हाला लगेच समजते. आजुबाजूच्या माणसांचा कसा उपयोग करून घेता यावर तुमच्या यशाचे गणित अवलंबून राहील. धंदा व्यवसायात नवीन शाखा उघडण्याच्या दृष्टीने पैसे व माणसांचा योग्य ठिकाणी वापर करून घ्याल. नोकरीत चांगल्या कामासाठी प्रशिक्षण मिळेल. कदाचित देशात किंवा परदेशात जाण्याचा बेत ठरेल.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26 


संधीचा उपयोग करा 
परिस्थिती आटोक्‍यात आणण्याचा तुम्ही निकराने प्रयत्न कराल. जो मार्ग निवडाल तो योग्य-अयोग्य ठरवून मगच पाऊल उचला. धंदा व्यवसायात बाजारातील हालचालींवर लक्ष ठेवा. नोकरीसाठी येणाऱ्या संधीचा योग्य तऱ्हेने उपयोग करा. घरात मोठ्या व्यक्‍तींचा सल्ला उपयोगी पडेल. कलाकार, खेळाडू व्यक्‍तींना त्यांच्या यशाकरिता धीराने वाटचाल करावी लागेल.

शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26 


पाहुणे येतील 
तुम्ही वास्तवापेक्षा स्वप्नामध्ये जास्त रमता. त्यातून नवनवीन कल्पना मनात येतात. पण त्यातील फारच थोड्या मनात रेंगाळतात. स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. हे सर्व करताना तुमच्या खिशाला परवडेल तेच करा. धंदा व्यवसायात हातातील पैशाचा योग्य कारणाकरता उपयोग करा. नोकरीत अवघड कामे निश्‍चयाने पार पाडाल. घरात पाहुण्यांची सरबराई करावी लागेल.

शुभ दिनांक : 15, 16, 17, 18, 19 ‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
60 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)