अनिता केळकर 

लग्नी बुध, हर्षल, धनस्थानात रवी, तृतीय स्थानात शुक्र, चतुर्थात राहू, सप्तमात गुरू वक्री, भाग्यात शनी व प्लुटो वक्री, दशमात मंगळ, केतू तर लाभात नेप्चून आहे. मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतलात तर यश तुमचेच आहे. आर्थिक स्थितीही चांगली राहील मानसन्मानाचे योग येतील.

मेष : नोकरीत उत्तम संधी
व्यवसाय व नोकरीत उत्तम संधी चालून येतील. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. शुक्राची साथ दिलासा देईल. नवीन मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सर्व कार्यात यश मिळेल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. परदेशगमनशाचे योग संभावतात. नोकरदारांना विशेष लाभ होतील. महिलांनी घाईने निर्णय घेऊ नयेत. कामे मनाप्रमाणे होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 27

वृषभ : लाभाची शक्‍यता
धार्मिक व सामाजिक कामात विशेष रस घ्याल. मन शांत राहील. अर्थप्राप्ती मनाप्रमाणे होईल. व्यवसायात अनपेक्षित लाभाची शक्‍यता. परदेशगमनाची संधी येईल. नोकरीत बदल किंवा बदलीस अनुकूल वातावरण लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. महिलांना आवडत्या छंदातून प्रसिद्धी मिळेल. मंगलकार्य घरात ठरतील. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24, 25, 26

मिथुन : आरोग्य चांगले राहील
मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज आता होईल. अनुभवांचा उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तणावाचे वातावरण दूर होईल. वरिष्ठांचे झालेले गैरसमज दूर होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नका. महिलांचे आरोग्य चांगले राहील. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. अभ्यासास पूरक ग्रहमान लाभेल.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24, 25, 26, 27

कर्क : आकांक्षा पूर्ण होतील
मनातील सुप्त इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. बराच काळ रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात परिस्थितीनुसार तडजोडीचे धोरण ठेवावे. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. हितचिंतकांची साथ मिळेल. नोकरीत पैशाच्या हव्यासापोटी चुकीचा मार्ग अवलंबू नका. सहकारी व वरिष्ठांची मदत आवश्‍यक तेथे घ्या. राहत्या घराचे प्रश्‍न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी मनन व चिंतन करावे.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24, 25, 26, 27

सिंह : कामाचा व्याप वाढेल
स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखून पुढे जा. कामाचा व्याप वाढेल. व्यवसायात आर्थिक बाबतीत काटेकोर राहून व्यवहार करावे लागतील. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. मानसन्मान मिळावेत. महिलांनी घरात सुसंवाद साधून कामे उरकावीत. मुलांनी अतिधाडस करू नये. विद्यार्थी, खेळाडूंना परदेशगमनाची संधी.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27

कन्या : प्रियजनांची भेट
महत्त्वाची कामे धसास लागतील. आर्थिक प्रगती उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. चांगले बदल घडतील. दगदग धावपळ वाढेल. नोकरीत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पेलाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पैशाचे व्यवहारात वेफिकीर राहू नका. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. सहजीवनाचा आनंद उपभोगाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नये.
शुभ दिनांक : 21, 24, 25, 26, 27

तूळ : अचानक धनलाभ
धार्मिक, सामाजिक कामातून प्रसिद्धी मिलेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. कामाच्या पद्धतीत बदल करून फायदा मिळवाल. अचानक धनलाभाची शक्‍यता. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांचा मूड पाहून आपल्या मागण्या मांडाव्यात. कामात गुप्तता राखावी. हितशत्रूंपासून सावध रहावे. महिलांना घरात जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागेल. विद्यार्थ्यांनी डोके शांत ठेवून संयमाने वागावे.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 27

वृश्‍चिक : संधीचा फायदा घ्या
तुमच्या मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त कसा फायदा घ्यायचा ते ठरवा. नवीन योजना साकार करताना सर्वांचे सहकार्य लाभेल. नोकरीत कामांना गती मिळेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतिपथावर राहणे शक्‍य होईल.
शुभ दिनांक : 21, 22, 23, 24, 25, 26

धनु : पैशांचा अतिमोह टाळा
व्यवसाय नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील इच्छा आकांक्षा फलद्रुप होतील. व्यवसायात कामांना मूर्त स्वरुप येईल. महत्त्वाचे करारमदार ठरतील. पैशांचा अतिमोह मात्र टाळा. बेकारांना नोकरी मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना आरोग्याची उत्तम साथ मिळेल. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. तरुणांना जीवनात अपूर्व संधी चालून येतील.
शुभ दिनांक : 22, 23, 24, 25, 26, 27

मकर : संधीचा फायदा घ्या
आर्थिकबाबतीत तुम्ही सतत विचार करता त्याचा उपयोग व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी करा. दूरदृष्टी ठेवून आलेल्या संधीचा फायदा घ्या व पुढे जा. व्यवसायाची अनेक दालने तुम्हाला खुली होतील. नोकरीत तूर्तास कोणताही बदल करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. महिलांना आपल्या आवडत्या छंदात वेळ घालवता येईल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 21, 24, 25, 26, 27

कुंभ : अडचणींवर मात
अनेक अडचणींवर मात करून कामात प्रगती कराल. व्यवसाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जाहिरात व आधुनिक पद्धतींचा वापर कराल. उलाढाल वाढवण्याकडे कल राहील. खेळत्या भांडवलाची सोय हितचिंतक व बॅंकांची मदतीमुळे होईल. नोकरीत कर्तव्याला प्राधान्य देऊन कामे पूर्ण कराल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. ही अपेक्षा ठेवू नका. महिलांनी सर्वांनी मिळते जुळते घेऊन वागावे.
शुभ दिनांक : 22, 23, 27

मीन : आर्थिक प्रगती वाढेल
ग्रहमान व वातावरणाची साथ मिळेल. अनेक कामातून यशश्री मिळेल. आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत राहील. व्यवसायात व नोकरीत मानसन्मान मिळतील. नवीन कामे हाताळण्याची संधी मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना चालना मिळेल. महिलांना मुलांच्या प्रगती व प्रकृतीबाबत चिंता कमी होईल. चांगली बातमी कळेल. तरुणांचे विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 21, 24, 25, 26

2 COMMENTS

  1. वरील समस्त ग्रहांचे वर्तविले भविष्य वाचण्यात आले प्रभात वृत्तपत्राने हे जे नवे खुलं सुरु केले आहे त्या मागील मुख्य उद्देश काय ? एकीकडे अंधश्रद्धेचा प्रचार करायचा आणि प्रत्यक्षात वाचकाला भविष्यवार विश्वास ठेवावयास प्रात्साहं द्यायचे त्यातही देशाचे भविष्य वर्तविले असते तर वाचकाला ग्रहमानानुसार पूर्वतयारी करणे सोईचे झाले असते त्या बद्दल चक्कर शब्द सुद्धा वरील वर्तविलेल्या भविष्यात वाचावयास मिळत नाही असे का ? ह्या ऐवजी नास्त्रडोमने जे जगाचे भविष्य वर्तविले आहे ते प्रकाशित केले असते तर आपल्या देशातील समस्त वाचकांना व त्यातही राजकीय मंडळींना उपयोग झाला असता दिवंगत शात्रज्ञ -संशोध स्टीफहन हॊकिंग ह्यांनी १०० वर्षांनंतर पृथ्वी हा ग्रह मानवास राहण्यास उपयुक्त तयहरणार नाही त्यासाठी दुसर्या ग्रहाचा शोध घेण्याचा मार्ग सांगून संपूर्ण जगाची झोप उडवून दिली मरणाच्या अंतिम क्षणी त्यांचे संशोधन विना प्रयोगशाळेविना सुरु होते कारण (भाग २ वर )

  2. भाग २ :- त्यांना संपूर्ण जगाची काळजी लागली होती व त्याच कारणाने त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले नसावे कारण ज्यांना ह्या विषयात नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे त्यांनी लावलेल्या संशोधनामुळेच जगावर हि आप्तही येण्यामागील इतर अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण असल्याचे स्टीफन ह्यांचे म्हणणे होते व त्या साठीच त्यांनी असे संशोधन थांबविण्याची कळकळीची जाहीर विनन्ति केली होती आपल्या भारतीय संत शास्त्रज्ञानी वरील भक्ती अनेक वर्ष अगोदरच केले आहे म्हणूनच स्टीफ्फान हॊकींग्ज ह्यांची गणना संतशास्त्रज्ञ म्हणून करणे हि काळाची गरज ठरते समुद्रात नदीत विहिरीत जर दगड बुडतो तर तीन चतृथौश पाण्याचे प्रमाण असूनही एक चतुरथुष् पृथी हा ग्रह अजून समुद्रात बुडाला कसा नाही हे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ तांत्रिक स्पष्टीकरण देऊन पृथ्वीची ग्रहमान स्थिती व भविष्य वार्तातील का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)