उत्सुकता भविष्याची: 10 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात राहू, सप्तमात शुक्र, अष्टमात गुरु, रवी व बुध, भाग्यात शनी, दशमात केतू तर लाभात मंगळ व नेपच्यून आहेत. ग्रहांची मर्जी राहील. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. कामाचे क्षेत्र वाढेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. सहलीचे योग येतील. 


मानसन्मानाचे योग 

ग्रहांची मर्जी राहील. व्यवसायात कर्तव्याला प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्र विस्तृत करून उलाढाल वाढवा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कामाचा ताण कमी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घ्या. वेळेत काम संपवा. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. घरगुती गोष्टींकडे लक्ष द्याल. महिलांना मनाप्रमाणे गोष्टी घडल्याचे समाधान मिळेल. सामुहिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील.

शुभ दिनांक : 10, 11, 12, 13, 1, 15 


प्रवास घडेल 

मनातील सुप्त बेत प्रत्यक्षात साकार झाल्याने आकाश ठेंगणे वाटेल. पैशाचा ओघ चालू राहील त्यामुळे खर्च वाढेल. व्यवसायात नवीन कामे हाती घ्याल. केलेल्या कामात यशाचे प्रमाण वाढेल. कामाच्या स्वरूपात बदल करून फायदा मिळवाल. नोकरीत नवीन ओळखी होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. जोडधंद्यातून लाभ होतील. घरात लांबलेले कार्यक्रम पार पडतील. शुभविवाह ठरतील.

शुभ दिनांक : 11, 12, 13, 14, 15,16 


चांगली बातमी कळेल 

कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस असेल. कधी युक्‍तीने तर कधी गोड बोलून कामे सहकाऱ्यांकडून करून घ्याल. व्यवसायात काम व पैसे योग्य तेथे खर्च करा. कामांना गती व वेग देण्यासाठी प्रयत्न राहील. जादा भांडवलाची तरतूदही करून ठेवाल. नोकरीत महत्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांवर सोपवा. मन:स्वास्थ अनुभवा. घरात नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील.

शुभ दिनांक : 10, 14, 15, 16 


प्रवास घडेल

सर्व ग्रहांची अनुकूलता उत्साह वाढवेल. व्यवसायात ताणतणाव कमी होतील. अपेक्षित कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल झाल्याने पैशाची स्थिती सुधारेल. प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून कामातील उलाढाल वाढण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत नवीन प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. प्रवास घडेल. घरात स्वत:करिता चार क्षण घालवू शकाल व इतरांनाही त्यात सहभागी करून घ्याल.

शुभ दिनांक : 11,12, 13, 16 


खर्च होईल 

महत्त्वाचे निर्णय स्वत: घेऊन प्रगती करण्याचा विचार असेल पण हातून काही चूक घडत नाही ना? याची टोचणीही मनाला असेल तेव्हा सबुरीने वागा. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन ठेवून वागा. जुनी येणी वसुल करण्याचा प्रयत्न करा. अंथरुण पाहून पाय पसरा. जोडधंद्यातून फायदा मिळेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहून जास्तीत जास्त सुखसुविधा मिळवण्याचा प्रयत्न राहील. दुरुस्ती, गृहसजावट यात खर्च होईल.

शुभ दिनांक : 10, 14, 15 


निर्णय अचूक ठरतील

आर्थिक नियोजनात तुमचा हातखंडा असतो. पूर्वी केलेल्या नियोजनाचा आता उपयोग होईल. व्यवसायात पैशाची ऊब मिळेल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नवीन कामे हितचिंतकाच्या मदतीने मिळतील. नोकरीत बढती, पगारवाढ इ. सारखी सुविधा मिळेल. नवीन दिशा नवा दृष्टीकोन जीवनात प्रगती घडवेल. घरात तरुणांचे विवाह जमतील. परदेश गमनांची संधी चालून येईल. महिलांचा वेळ मजेत जाईल.

शुभ दिनांक : 10, 11, 13, 16 


प्रवासाचे बेत 

काम व सुख एकाच वेळी उपभोगण्याची तुमची मनिषा पूर्ण होईल. व्यवसायात अनावश्‍यक खर्च कमी करून योग्य तेथेच पैसे खर्च कराल. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे खुबीने सहकाऱ्यांकडून करवून घ्याल. नोकरीत कामाचा ताण असला तरी काम करण्याचे स्वातंत्र्य असेल. आपली कामेच्छा पूर्ण होईल. अंगी असलेल्या गुणांची कदर होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत पार पडतील.

शुभ दिनांक : 10,11, 12, 13, 14, 


शुभकार्य पार पडेल 

जीवनात चांगले घडण्याची आशा निर्माण झाल्याने कामाला हुरूप येईल. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. व्यवसायात योग्य व्यक्‍तींची मदत व सल्ला उपयोगी पडेल. नोकरीत कामाचा बाऊ जास्त कराल. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल. कला, क्रीडा, राजकारण इ. क्षेत्रातील व्यक्‍तींना प्रसिद्धी झोतात राहण्याची संधी मिळेल.

शुभ दिनांक : 10,11,12,13,14,15,16 


खर्च वाढेल 

कामांना अपेक्षित गती आल्याने लक्ष इतर गोष्टींकडे केंद्रित कराल. व्यवसायात उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाचे नियोजन करा. खेळत्या भांडवलाची तरतूद होईल. वेळ व पैसा याची योग्य सांगड अपेक्षित लाभ घडवून आणेल. वरिष्ठ कामाचा तगादा लावतील. न रागवता जमेल तसे काम संपवा. मैत्री व व्यवहार याची गल्लत करू नका. घरात खर्च वाढेल. पाहुण्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल.

शुभ दिनांक : 10,11,12,13, 14,15 


नवीन ओळखी होतील 

तुम्ही स्वभावाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न कराल व त्यात यशही मिळेल. विचार न करता बिनधास्त जगण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात नवीन कामाची धुरा सांभाळाल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. लांबचे प्रवास होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. मनासारखे काम झाल्याने मानसिक समाधान मिळेल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. आवडत्या व्यक्‍तीचा सहवास.

शुभ दिनांक : 11, 12, 13, 14, 15 


खर्चाचे प्रमाण वाढेल 

जो दुसऱ्यावर विसंबला… ही म्हण सार्थ ठरेल. आळशी स्वभाव नडेल. व्यवसायात कामात शिथिलता येईल. नको त्या कामात वेळ जाईल. आर्थिक स्थिती मात्र समाधानकारक राहील. नोकरीत मिळालेली संधी वाया घालवू नका. कामात गुप्तता राखा. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या व इतर व्यक्‍तींच्या मागण्या मान्य कराल. जीवनाचा भरपूर आनंद घ्याल. महिलांनी बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा.

शुभ दिनांक : 10,14, 15, 16 


कमी श्रमात यश 

डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे प्रगती साधा. व्यवसायात दुर्लक्ष झालेल्या कामात लक्ष घालून गती द्या. आवश्‍यक वाटल्यास महत्त्वाचे निर्णय घ्या. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करा. आपल्या मागण्या वरिष्ठांचा मूड बघून मान्य करून घ्या. कमी श्रमात जास्त यश मिळेल. न चिडता सारासार विचार करून कृती करा. प्रिय व्यक्‍तींच्या सहवासाने आनंद मिळेल. तरुणांना मनपसंद जीवनसाथी मिळेल.

शुभ दिनांक : 10, 11, 12, 13, 16 


 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)