उत्सुकता कायम ठेवणारा… पॅनिक अटॅक (इफ्फी 2018)

इफ्फी मध्ये वर्ल्ड पॅनोरमा विभागात पॅनिक अटॅक हा चित्रपट दाखवला गेला. चार ते पाच वेगळ्या सिचुएशन्स आणि त्याही सगळ्या एकमेकांशी निगडित असलेल्या… अशा प्रकारचा चित्रपट पाहायला नक्कीच मजा येते. प्रेक्षक म्हणून तुम्ही उत्सकुतेने सगळ्या सिचुएशन्स छान एन्जॉय करता. दिग्दर्शक पावेल मॅस्लोना याचा हा पहिलाच चित्रपट, पदार्पणातच त्याने एक उत्तम प्रकारची फिल्म करण्याचा प्रयत्न केलाय.

एक चाळीशीतील जोडपं विमानात प्रवास करत असतं. त्यांचा प्रवास खूप मोठा असतो. त्या जोडप्या शेजारी एक प्रचंड जाड व्यक्ती येऊन बसतो. ती जाड व्यक्ती त्या जोडप्याला बडबड करून खूप त्रास देत असते. एवढ्यात एयर टरब्युलन्स होतो, त्या दरम्यान ते जोडपं खूप घाबरतं. पण एयर टरब्युलन्स संपल्यानंतर ते जोडपं शांत होतं. त्यांच्या शेजारील जाडी व्यक्ती सुद्धा शांत होते, खरं तर ती व्यक्ती एयर टरब्युलन्स मुळे हार्ट अटॅक येऊन जागीच मरण पावते. हे त्या जोडप्याला सुद्धा कळतं, पण आपण जर आत्ताच विमानातील स्टाफला ही व्यक्ती मरण पावल्याचे सांगितलं तर विमान इथंच मध्येच कुठेतरी थांबवतील व आपल्याला कार्यक्रमाला पोहोचायला उशीर होईल यामुळे ते जोडपं शांत बसून राहतं त्यानंतर पुढची गंमत चित्रपटातच पाहायला मजा येते.

एका तरुणीचा बॉयफ्रेंड स्वतःला गोळी घालून आत्महत्या करतो, याबद्दल तिला माहितीच नसतं, पण तिच्या तीन रिकामटेकड्या मैत्रिणींना याबद्दल कळतं. त्या मैत्रिणीला आधार दयायला त्या तिच्या घरी पोहोचतात, पण तिथे ती मैत्रीण बाहेरगावी जाण्याच्या प्रयत्नात असते…एक तरुण वेटर म्हणून काम करत असतो, त्याच्या घरी कॉप्म्युटर वर एका ऑनलाईन गेम मध्ये त्याला फसविण्यासाठी कुणीतरी दुसरीच व्यक्ती सतत फोन करून त्याला गेमवर एक्स्पोज करेल अशी धमकी देत असते. आपलं काम सांभाळून तो तरुण त्या फोन ला उत्तर देत असतो…अशा प्रकारच्या आणखी ३ सिचुएशन्स चित्रपटात दाखवल्या गेल्या आहेत.

१०० मिनिटांच्या या सिनेमात आगळ्या-वेगळ्या प्रसंगांमध्ये अडकलेल्या लोकांचं शेवटी काय होतं हे जाणून घेण्याची आपल्याला प्रचंड उत्सुकता असते. याबाबत दिग्दर्शक नक्कीच यशस्वी झालाय. शिवाय प्रत्येक प्रसंगाला तेवढंच अनुरूप असं पार्श्वसंगीत वापरल्यामुळे ते प्रसंगसुद्धा छान झालेत.

इफ्फी दरम्यान प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे चित्रपट पाहायला मिळतात. यंदाच्या इफ्फीमध्ये सुद्धा पॅनिक अटॅक सारखे आणखीन कोणकोणते सरप्राईजेस असणार आहेत याचीच आता उत्सुकता आहे.

– अमोल ज्ञानेश्वर कचरे (इफ्फी 2018, पणजी, गोवा)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
1 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)