उत्साहाचे थरावर…थर!

सुवर्णयुग मित्र मंडळाची हंडी वरळीच्या पथकाने

हुतात्मा बाबू गेनू मित्र मंडळाची हंडी फोडली शिवतेज गोविंदा पथकाने

पुणे – “गोविंदा आला रे आला…. मच गया शोर सार नगरी रे…. गोविंदा रे गोपाळा’ अशा एकापेक्षा एक गाणी, आकर्षक फुलांची सजावट करून उंचावर बांधलेली दंहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांनी रचलेले मनोरे तसेच डिजेच्या तालावर नाचत रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात सोमवारी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील मध्यवर्ती भागातील बाबू गेनू मित्र मंडळ, सुवर्णयुग मित्र मंडळाने दहीहंडी उत्साहात साजरी केली. नागरिकांनीही मोठ्या गर्दी केली होती.

गाण्याच्या तालावर ठेका धरत शहरातील विविध भागांत मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी झाली. ठिकठिकाणी तरुणांनी एकच गर्दी करून दहीहंडीला प्रतिसाद दिला. जागोजागी मानवी मनोऱ्यांचा थरार अधिकच रंगतदार दिसत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट यांनी जल्लोषात दहीहंडी साजरी केली. शहरातील दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असणाऱ्यां सुवर्णयुग तरुण मंडळ, बाबू गेनू या मंडळांच्या हंड्या रात्री उशीरा फोडण्यात आल्या.

सुवर्णयुग तरुण मंडळाची हंडी रात्री 9 वाजून 7 मिनीटांनी मुंबईतील वरळीच्या शाहीर अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाच्या गोविंदा पथकाने 6 थर लावून फोडली तर हुतात्मा बाबू गेनू मंडळाची हंडी रात्री 10 वाजता कसबा पेठेतील शिवतेज गोविंदा पथकाने सात थर लावून तिसऱ्या प्रयत्नात फोडली. दरम्यान, जिलब्या मारुती मंडळ, नातू बाग मंडळ अशा महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंडळांबरोबरच पेठांमधील लहान मोठ्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी गर्दी केली होती. शहरासह उपनगरांतही दहीहंडी उत्साहात साजरी झाली. कोथरुड, वारजे, हडपसर, सिंहगड रस्ता, पाषाण, औंध, कात्रज, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी गोविंदा पथकांवर बक्षिसांची बरसात करण्यात आली.

दरम्यान, बाबू गेनू मंडळाच्या ठिकाणी शिवतेज पथकाच्या एक गोविंदा जखमी झाल्याने त्याला तत्काळ दवाखान्यात हलवण्यात आले.

दहीहंडीला पावसाची दांडी
दहीहंडीसाठी सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात संततधार पावसाने हजेरी लावली. मात्र, ऐन दहीहंडी फोडण्याच्या वेळी पाऊस न आल्याने काही प्रमाणात गोविंदा पथकांची निराशा झाली. मात्र, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी उंच थराचे मनोरे रचले होते. तर, डिजेवर लावलेल्या वेगवेगळ्या गाण्यांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेभान नाचून आनंद द्विगुणीत केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)