उत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-१)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासक कंपन्या विविध ऑफरचा मारा करतात. अशा ऑफरमुळे ग्राहकही गुंतवणूक करण्यास आणि खरेदी करण्यास उत्सुक राहतात हे प्रॉपर्टी रिसर्च संस्थांनीदेखील मान्य केले आहे. आता उत्सवाचा, सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत रिऍल्टी बाजार या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कंबर कसून तयार असतो.

उत्सव काळात प्रत्येक कंपन्या आपल्या उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलत देत असतात. रिअॅल्टी कंपन्यादेखील या शर्यतीत मागे राहात नाहीत. रिअॅल्टी, बिल्डर कंपन्यांदेखील ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून आकर्षित करतात, जेणेकरून मालमत्तेची, फ्लॅटची अधिकाधिक विक्री होईल. काही कंपन्या फ्लॅट बुकिंगवर अनेक प्रकारच्या ऑफर सादर करत असताना खरेदीवरही मोठ्या प्रमाणात रोख सवलत देण्याचा देखील प्रस्ताव मांडतात. अनेक कंपन्या इलेक्‍ट्रॉनिक कंपन्यांपासून इंटिरिअर डेकोरेशनचे काम मोफतपणे उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या ऑफरमुळे ग्राहक निश्‍चितच खरेदीसाठी उत्सुकता दाखवतील, असा विश्‍वास रिअॅल्टी कंपन्यांना असतो.

सर्वसाधारणपणे नवरात्रापासून सुरू झालेल्या ऑफर या दिवाळीनंतर म्हणजे वर्षाअखेरपर्यंत चालू राहतात. प्रत्येक ग्राहकाला यादरम्यान बुकिंगवर एक निश्‍चित भेटवस्तू मिळत असते. उत्सवादरम्यान फ्लॅटसच्या बुकिंगमध्ये अनेकपटीने वाढ होते. अशा प्रकारचा कल आपण गेल्या काही वर्षांपासून अनुभवास घेत आहोत. तज्ज्ञांच्या मते, भारतात घर खरेदी ही एकप्रकारे उत्सवाचाच भाग आहे. घर खरेदी किंवा तत्सम स्वरूपाची खरेदी हा एक परंपरेचा भाग असून अशा प्रकारचे काम एखाद्या शुभमुहुर्तावर केले जाते. या कारणामुळेच नवरात्र आणि दिवाळीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात असतात. अशा स्थितीत ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी रिऍल्टी कंपन्या या निमित्ताने सवलत आणि भेटवस्तू देतात. तसे पाहिले तर बदलत्या काळानुसार आता प्रत्येक ग्राहक बऱ्यापैकी चौकस बुद्धीने व्यवहार करताना दिसून येतो. आकर्षित करणाऱ्या जाहिरातीची चाचपणी केल्याशिवाय ग्राहक घर खरेदीचा विचार करत नाही. या खरेदी निर्णयात दीर्घकालीन नफा-तोटा याचा विचार करूनच तो घर खरेदीचा निर्णय घेतो. बहुतांश बिल्डर फ्लॅट विक्री करताना वाटाघाटीस तयार असतात. यातून ग्राहक सवलतीपेक्षाही अधिक लाभ पदरात पाडून घेण्याबाबत सजग असतो.

-Ads-

उत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-२)

– विधिषा देशपांडे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)