उत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …… (भाग-२)

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासक कंपन्या विविध ऑफरचा मारा करतात. अशा ऑफरमुळे ग्राहकही गुंतवणूक करण्यास आणि खरेदी करण्यास उत्सुक राहतात हे प्रॉपर्टी रिसर्च संस्थांनीदेखील मान्य केले आहे. आता उत्सवाचा, सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. अशा स्थितीत रिऍल्टी बाजार या वातावरणाचा फायदा घेण्यासाठी कंबर कसून तयार असतो.

उत्सवाच्या काळात मालमता खरेदी करताना …. (भाग-१)

तज्ज्ञांच्या मते, उत्सवाच्या काळात सवलत मिळणे ही एक फायद्याची बाब आहे., मात्र, बुकिंग करताना काही महत्त्वाच्या बाबी देखील ध्यानात घेणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही बाबी इथे नमूद करता येतील.

-Ads-

सवलतीच्या नावावर फसवणूक तर नाही?
घर खरेदी करताना ग्राहकांनी अधिक दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. ऑफरच्या नादात आपण चुकीच्या ठिकाणी पैसे तर गुंतवत नाही ना? हे पाहिले पाहिजे. उदा. एखाद्या रिऍल्टी इस्टेट कंपनीने फ्लॅट बुक केल्यानंतर गाडी, सोने किंवा परदेश प्रवासाचे ऑफर दिली असेल तर अगोदर त्या फ्लॅटची मूळ किंमत किती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. फ्लॅटची किंमत आणि सवलत याची चाचपणी करा.

बजेटमध्येच खरेदी करा
जर आपल्याला पाच लाखांची ऑफर मिळत असेल आणि घराची किंमत चाळीस लाख आहे आणि आपले बजेट 25 लाख असेल तर आपल्याला दहा लाख रुपये अतिरिक्‍त द्यावे लागतील. त्यानुसार गृहकर्जाची व्यवस्थादेखील करावी लागेल. यातून मासिक हप्तादेखील वाढेल. हा हप्ता आपल्या क्षमतेत आहे की नाही, याचे आकलन करा.

सवलतीबरोबरच छुपे शुल्क तर नाही?
सर्वसाधारणपणे खरेदीदार मालमत्ता खरेदी करताना विकसकाकडून सादर केलेले ब्रोशरला गृहित धरतात. त्याच्या आकर्षक रचनेने ग्राहक हुरळून जातात. प्रत्यक्षात ऑफरमध्ये अनेक प्रकारचे छुपे शुल्कदेखील असू शकतात. खरेदीदार घर बुक करताना लहानसहान शुल्काकडे लक्ष देत नाहीत.

गरजांकडे लक्ष द्या
ज्या ठिकाणी आपण नोकरी करतो तेथेच फ्लॅट बुक करायला हवा. डिस्काऊंटच्या नादात आपण दूर अंतरावर जर फ्लॅट खरेदी करत असाल तर आपण महत्त्वांच्या गरजांकडे लक्ष देत नाहीत, असे दिसून येते. कालांतराने त्याचा मोठा फटका बसू शकतो. जर आपण गुंतवणूक म्हणून फ्लॅट खरेदी करत असाल तर कोणत्याही क्षेत्रात फ्लॅट खरेदी करू शकता. मात्र आगामी काळात संबंधित परिसरात मालमत्तेच्या किंमतीतील वाढीच्या शक्‍यतेचे आकलन करावे.

कागदपत्राची चाचपणी करा
उत्सवाच्या काळात कितीही सवलत मिळत असो तरीही आपण सजगपणे खरेदीचा व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे. घराशी निगडीत सर्व कागदपत्रांची तपासणी काळजीपूर्वक करावी. यासाठी नामांकित ब्रोकर किंवा वकिलांचा सल्ला घ्यावा.

उत्सवाच्या काळात व्यवहार फायदेशीर
बहुतांश नागरिकांना उत्सवाच्या काळात बोनस किंवा अन्य भत्त्यांच्या रूपातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यामुळे या काळात मालमत्ता खरेदीची योजना आखली जाते. कारण खरेदीदाराला ऑफरच्या आधारावर कमी किंमतीत चांगल्या सुविधा मिळतात.

अनेक बॅंकादेखील उत्सवाच्या काळात अनेक ऑफर जाहीर करतात. या काळात निश्‍चित रूपाने बॅंका कमी व्याजदरावर कर्ज, काही शुल्कात सवलतीची घोषणा करतात. बहुतांश खरेदीदार या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.
विकासकदेखील बंपर ऑफरच्या मदतीने अनेक प्रकारच्या सवलती जाहीर करतात आणि खरेदीदार देखील या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात.

अनेक विकासक उत्सवाच्या काळात मोफत मॉड्युलर किचन, फ्री पार्किंग सुविधा, स्टॅंप ड्यूटी आणि नोंदणी शुल्कावर विशेष सवलती आदी विशेष प्रस्तावाची योजना जाहीर करतात.
उत्सवाच्या काळात बहुतांश विकासक रोख सवलत, सोन्याचे नाणे, फ्री हॉलिडे, कूपन आणि अन्य सवलती प्रदान करतात. या कारणांमुळेच मालमत्ता खरेदीचे सर्वाधिक व्यवहार उत्सवाच्या काळात होतात.

– विधिषा देशपांडे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)