उत्सवांच्या खर्चात अनियमितता पडणार महागात

पिंपरी – सण-सोहळ्यांसह उत्सवात अनियमितता झाल्यास सण-सोहळ्यांवरील खर्च करणाऱ्या संबंधित विभाग प्रमुखांना जबाबदार धरण्यात यावे, असा आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

राष्ट्रीय पुरुष, थोर महापुरुष व्यक्‍तींचा जयंती महोत्सव, राष्ट्रीय दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करा, अशा सक्‍त सुचना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यभरातील महापालिकेला दिलेल्या आहेत. परंतु, महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी शासन आदेशाला हरताळ फासून केवळ प्रबोधन आणि मनोरंजनाच्या नावावर महापुरुषांच्या जयंती उत्सवात दरवर्षी लाखो रुपये खर्च करत आहेत. या खर्चाच्या मर्यादेला तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व पारदर्शकतेचा बाऊ करणारे, सध्याचे सत्ताधारी भाजपकडूनही लगाम घातला नाही. यंदाही महापुरुषांच्या जयंती उत्सवावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.

-Ads-

राज्य शासनाने 27 डिसेंबर 2017 मध्ये राष्ट्रीय पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीय दिन साजरे करताना सामान्य प्रशासन विभागाने काही मर्यादा घालून दिल्या आहेत. मात्र, जयंती उत्सव साजरे करताना शासनाचे आदेश महापालिका पायदळी तुडवू लागली आहे. या आदेशात शासनाने केवळ 28 महापुरुषांची जयंती साजरी करायची, त्यांच्या कार्यक्रमाचे स्वरुप कसे राहिल, याबाबत स्पष्ट सूचना महापालिकेला केलेल्या आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन होताना दिसत आहे.

दरम्यान, शासन पत्राचे अवलोकन करुन संदर्भीय शासन पत्रामध्ये नमूद केलेल्या रिट याचिका क्रमांक 4689/2016 नूसार आणि 2 ऑगस्ट 2017 च्या आदेश, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, कलम 66 तसेच संदर्भीय शासनाकडील पत्र महानगरपालिकेच्या विभाग प्रमुखांना पाठविण्यात आलेले आहेत. महापालिकेच्या मार्फत सण-सोहळे, उत्सव साजरे करताना शासनाने पत्रान्वये दिलेल्या सुचना, आदेशाचे संबंधित विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, यात अनियमितता झाल्यास सदरील सोहळा, उत्सवांवरील खर्च प्रस्तावित करणारे संबंधित विभाग प्रमुख जबाबदार राहणार आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)