उत्सवकाळात सावधान, स्वाइन फ्लू परततोय..!

File Photo

– श्रद्धा कोळेकर

पुणे – जानेवारी ते जुलैअखेर या सात महिन्यांत स्वाइन फ्लू झालेल्यांची रुग्णांची संख्या जी 15 होती, ती आजमितीला 68 वर जाऊन पोहचली आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यात जवळपास 50हून अधिक स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणखीही सहा जण दगावल्याची भीतीदेखील व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळेच येत्या उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

“मला काही होणार नाही,’ अशा अविर्भावात आपल्यातील अनेक जण सर्वत्र वावरत असतात. त्यामुळेच अनेकदा तोंडावर रुमाल न धरता शिंकणे, आजारी व्यक्‍तींच्या सानिध्यात राहणे हे अनेकांना महागात पडते. दुखणे अंगावर काढणे हा त्यातील दुसरा प्रकार आहे. घरगुती उपाय करत स्वत:च डॉक्‍टर बनणे हे अनेकांना सध्याच्या काळात तरी खूप महागात पडण्याची शक्‍यता आहे.

सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, स्वाइन फ्लू आदी प्रकारच्या साथीच्या रोगांसाठी वातावरण पोषण आहे. त्यामुळेच या काळात हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच दुखणे अंगावर काढणे म्हणजे हा साथ रोग पसरविण्यासाठी एकप्रकारे आपण मदतच करण्यासारखे आहे. स्वाइन फ्लूला 48 तासांच्या आत जर प्रतिबंध केला, तर तो आटोक्‍यात येण्याची शक्‍यता असते. मात्र, अनेकजण पहिले तीन ते चार दिवस ताप अंगावर काढतात व मग डॉक्‍टरांकडे धाव घेतात. अनेकदा त्यामुळे डॉक्‍टरांच्या हातातही फारसे काही उरलेले नसते.

सध्या गौरी व गणपतींमुळे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे लोक एकत्र येणार आहेत. तसेच या उत्सव काळात अनेक ग्रामीण भागातील लोकही पुणे-मुंबईसारख्या शहरात पर्यटनासाठी येणार आहेत. त्यामुळेच या काळात हा रोग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्‍त केली गेली आहे. त्यामुळेच नागरिकांनी आता स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे आहे. सध्या स्वाइन फ्लूविरोधी लस अत्यंत महागडी असून ती जितक्‍या प्रमाणात अपेक्षित आहे, तितकी मिळालेली नाही. त्यामुळेच काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा गणपतींबरोबर शहरात स्वाइन फ्लूचेही वास्तव्य होईल. गणपती दहा दिवसांत जातील मात्र स्वाइन फ्लूला घालविणे कठीण होऊन बसेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)