उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडे प्रचंड माया

तब्बल सव्वा कोटीची रोकड जप्त
भोपाळ – मध्यप्रदेशातील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने गैरमार्गाने प्रचंड माया गोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या विविध मालमत्तांवर छापे टाकून लोकायुक्त पोलिसांनी तब्बल 1 कोटी 25 लाख रूपयांची रोकड जप्त केली.

जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून रूजू असणाऱ्या पराक्रमसिंह चंद्रावत याने मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असल्याची तक्रार लोकायुक्त पोलिसांकडे दाखल झाली. त्यानंतर चंद्रावतच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. त्यातून त्याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे उघड झाले. त्याच्या मालकीचे दोन पेट्रोल पंप आणि सहा गोदामे असल्याची माहिती पुढे आली.

या मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. त्याच्याकडे दोन आलिशान कार आणि इतर किमती ऐवज असल्याचे समोर आले. चंद्रावतच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अजून अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी लोकायुक्त पोलीस आणखी कारवाईसाठी सज्ज झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)