उत्पादन शुल्कचा अधिकारी लाचलुचपतच्या टप्प्यात 

तीन हजार रुपयांचा मासिक हप्ता अंगलट

सातारा – फलटण येथे सुरू असलेल्या बिअर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्रास होऊ नये यासाठी बार मालकाडून दर महिना तीन हजार रुपयाची लाच स्विकारणारा राज्य उत्पदान शुल्कचा अधिकारी कानडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही घटना दि.22 रोजी घडली आहे. मात्र तपासाअंती सोमवारी गुन्हा दाखल झाल्याचे एसीबीने कळवले.

बीअर बार चालवताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनेकदा त्रास दिला जात होता. हा त्रास होवू नये म्हणून फलटणमधील एका बीअर बारच्या मालकाने चक्क फलटण येथील राज्य उत्पादनचे अधिकारी कानडे यांना गळ घातली. कानडे यांना तुम्ही आम्हाला त्रास देवू नका. काही असेल तर सांगा अशी विनंती बार मालकाने केली होती.त्यानुसार कानडे यांनी बार मालकाला प्रतिमहिना तीन हजार रुपयाची मागणी केली.

सदरची रक्कम स्विकारताना कानडे लाचलुचपतच्या जाळ्यात अलगद सापडले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला, सहाय्यक फौजदार कुलकर्णी, सपकाळ, हवालदार शिंदे, काटवटे, राजे, ताटे, कर्णे, साळुंखे, अडसुळ, काटकर, खरात, माने यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)