उत्पादक-व्यापाऱ्यांना मुदतवाढ नाही

रामदास कदम : प्लॅस्टिक बंदी काटेकोरपणे राबविण्याचे आदेश
मुंबई- राज्यात प्लॅस्टिक बंदी कायम असून यापुढे व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ दिली जाणार नाही, अशा शब्दात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी ठणकावून सांगितले. प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करुन राज्यातील प्लॅस्टिक बंदीची मोहिम काटेकोरपणे राबविण्याचे आदेश कदम यांनी दिले.

कदम यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून बनविणाऱ्या वस्तूंवर बंदीची घोषणा केली होती. त्यावर तात्काळ कार्यवाही करीत 23 जुलैपासून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजवणी सुरु झाली. हा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील प्लॅस्टिक उत्पादक व व्यापाऱ्यांनी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेत मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. ही मुदत आता संपत आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)