उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दती महत्वाची

शेतीतज्ञ आशिष गणपुले यांचे प्रतिपादन
कराड – कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पन्न घेण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पध्दती महत्वपूर्ण काम करत असते. एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करुन विविध रोग तसेच किडींवर नियंत्रण मिळविता येते. बियाणे खरेदी करण्यापूर्वी सदरचे वाण हे किडीस व रोगास प्रतिकारक आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती घेणे ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे प्रतिपादन शेतीतज्ञ आशिष गणपुले यांनी केले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित यशवंत कृषी औद्योगिक प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी आयोजित चर्चासत्रात एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर ते बोलत होते. गणपुले म्हणाले, पिकांची लागवड करण्यापूर्वी त्या विभागामध्ये येणाऱ्या किडींची माहिती करुन घेणे गरजेचे आहे. एखाद्या किडीची किंवा रंगाची तिव्रता त्या विभागात अधिक असल्यास लागवडीसाठी कीड रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. घाटे अळी व पाने खाणारी अळी या किडीच्या नर पतंगाला आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा अवलंब करावा. तसेच पांढरी माशी, मावा, नागअळी यांच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.

याशिवाय फुलकिडे या किडीचे सर्वेक्षण व नियंत्रण करण्यासाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे वापरावेत व त्याद्वारे किडींचे व्यवस्थापन करावे. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये जैविक नियंत्रण ही एक अत्यंत महत्वाची कीड नियंत्रण पद्धती आहे. यामध्ये परोपजीवी कीटक, भक्षक कीटक, सूक्ष्म जिवाणू, विषाणू, बुरशी यांचा समावेश होतो. निसर्गात त्यांची अगणित संख्या असते. या उपयुक्त कीटकांचा वापर करुन कीड नियंत्रणात आणता येते. तणांमुळे किडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढतात.

विविध प्रकारच्या किडींचे तणनावर संगोपन होत असते. तसेच तणे मुख्य पिकांशी खते व पाण्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होत नाही व पर्यायाने उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये तणांचा नायनाट करणे याला महत्वाचे स्थान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)