तेहरान (ईराण) – उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सुधारणाऱ्या संबंधांचे ईराणने स्वागत केले आहे. मात्र आपला शब्द पाळत नसलेल्या अमेरिकेची दोन कोरियांचे संबंध सुधारण्यामध्ये काहीही भूमिका नसल्याची टिप्पणी जोडली आहे. किम जोंग ऊन आणि मून जे इन यांच्यातील शिखर परिषद हे जागतिक शांततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी पाऊल असल्याचे ईराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरियन द्वीपकल्पात शांती निर्माण करण्याचे वातावरण उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोघांनीही अन्य कोणत्यीही देशाच्या हस्तक्षेपाविना निर्माण करावे, असे ईराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बहराम घासेमी यांनी म्हटले आहे. परमाणू करारासंबंधी अमेरिकेचा अनुभव फारसा विश्वसनीय आणि मर्यादा राखणारा नसल्याचा ईराणला गेल्या 40 वर्षांचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय करारांचे अमेरिका पालन करत नाही, असे बहराम घासेमी यांनी म्ह्टले आहे.
सन 2015 मध्ये ईराणने आपले अण्वस्त्र कार्यक्रम बंद करून अमेरिका आणि इतर पाच देशांबरोबर करार केला होता. मात्र अमेरिका या कराराचे उल्लंघन करत अन्य देशांबरोबरच्या ईराणच्या संबंधात अडथळे आणत होता. आणि आता 12 मे रोजी त्या कराराचे नूतनीकरण करण्याची वळ् आली तेव्हा अमेरिकेने करारातून दूर होण्याची धमकी दिली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा