उत्तर मालीमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ल्यात 14 ठार

बमाको – मालीच्या उत्तरेकडील एका लष्करी तळावर इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान 14 सैनिक ठार झाले. सैन्याचे प्रवक्‍ते कर्नल दियारान कोन यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तिबुक्‍लू भागामध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यामध्ये 17 हल्लेखोरही मारले गेले आहेत. या धुमश्‍चक्रीनंतर या लष्करी तळावर पुन्हा एकदा माली सैन्याचा ताबा प्रस्थापित झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालीच्या उत्तर भागामधून इस्लामी कट्टरवाद्यांना सत्तेवरून हुसकावून लावण्यासाठी फ्रेंच दूतावासाकडून झालेल्या कारवाईच्या पाचवा स्मृतीदिन मालीमध्ये नुकताच झाला. तेंव्हापासून मालीच्या लष्करावर तसेच संयुक्‍त राष्ट्राच्या शांतता फौजांवर कट्टरवाद्यांनी अधुनमधून हल्ले झाले आहेत. गेल्या जानेवारीमध्ये पूर्वेकडील गाओ शहरामध्ये लष्करी तळावर झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 54 जण ठार झाले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)