उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देणार – फडणवीस

मुंबई – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांना मानधन देण्याचा निर्णय घेऊ, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

सन 2018-19 च्या अर्थसंकल्पातील गृह, सामान्य प्रशासन शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण या विभागांच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. याआधी पोलिसांना नेमणुकीच्या ठिकाणी राहण्यासाठी होस्टेल सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सभागृहात दिली. पोलिसांची शंभर टक्के पदे भरण्यात येतील.अंमली पदार्थ विरोधी कक्ष, तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी कक्ष सशक्त करण्यात येत आहे, असेही केसरकर म्हणाले.

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांची कामे केली जातील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्याच्या सीमा भागातील रस्त्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे, असे ते म्हणाले.

तालुका क्रीडा संकुलांना यापुढे वाढीव निधी उपलब्ध करून देऊन ती क्रीडा संस्थांना चालवायला देऊ. टोकियो आँलिम्पिकसाठी राज्यात 62 खेळाडूंची नावे पुढे येत आहेत राज्याचे स्पोर्ट कोड तयार करण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली. मराठवाड्यातील निझाम काळातील जुनाट शाळा इमारत पुनर्बांधणीसाठी लवकरच धोरण आखले जाईल, असेही तावडे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)