उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधु सरसावले -जयंत पाटील

मुंबई: उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय मेळाव्याला लावलेली उपस्थिती हे केवळ मतांसाठी असलेले राजकारण आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे. मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील लोकांना स्थिरता मिळावी यासाठी काहीच केले नाही. त्यामुळेच आता उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधु सरसावले आहेत, असे ते म्हणाले.

दरम्यान जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर देखील टीका केली, २० हजार कोटी रुपये सरकार पुरवणी मागण्यांद्वारे खर्च करायला तयार आहे, मग ५०० कोटी रुपये एखाद्या संस्थानाकडे मागणे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वासार्हता किती कमी झाली, असल्याचे पाटील म्हणाले

अयोध्या दौऱ्यावर बोलताना जयंत पाटील

उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय मेळाव्याला लावलेली उपस्थिती हे केवळ मतांसाठी असलेले राजकारण आहे, असे मत प्रदेशाध्यक्ष Jayant Patil – जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबईतला मराठी टक्का कमी झाला आहे. मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना आणि मनसे या पक्षांनी मुंबईतील लोकांना स्थिरता मिळावी यासाठी काहीच केले नाही. त्यामुळेच आता उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधु सरसावले आहेत, असे ते म्हणाले.

Posted by Nationalist Congress Party – NCP on Monday, 3 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)