उत्तर भारताला पावसाचा तडाखा; 28 जणांचा मृत्यू

संग्रहित छायाचित्र

सिमला – केरळ पाठोपाठ उत्तर भारतालाही पावसाने तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तीन राज्यांत मिळून 28 जण मृत्युमुखी पडले. पावसाचा सर्वांधिक फटका बसलेल्या हिमाचल प्रदेशात 18 तर उत्तरप्रदेशात 9 जणांचा बळी गेला. हिमाचलात रविवारपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातून 6 राष्ट्रीय महामार्गांसह 923 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले.

हिमाचलच्या प्रशासनाने पर्यटकांना प्रवास लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा 16 ऑगस्टला होणारा हिमाचल दौराही रद्द करण्यात आला. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब या राज्यांच्या विविध भागांतही मुसळधार पाऊस कोसळल्याचे वृत्त आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)