उत्तर भारतात पावसाचे थैमान; 8 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – उत्तर भारतात सोमवारी पावसाने थैमान घातले. त्यामुळे काही राज्यांना पुराचा फटका बसला. याशिवाय, दरडी कोसळण्याच्याही घटना घडल्या. पावसामुळे विविध दुर्घटना घडून आठ जण मृत्युमुखी पडले.

मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जम्मू-काश्‍मीरच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली. त्या राज्याच्या दोडा जिल्ह्यात दरड कोसळून एक घर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्या दुर्घटनेत संबंधित कुटूंबातील पाच जण मृत्युमुखी पडले. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या बऱ्याच भागांना पावसाने झोडपले. हिमाचलमध्ये अनेक घरांचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. त्या राज्यातील कुलू जिल्ह्यात हाय ऍलर्ट जारी करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसामुळे पंजाब आणि हरियाणातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस आणि पुराच्या तडाख्यामुळे संबंधित राज्यांत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. देशाची राजधानी दिल्लीत पावसामुळे रस्ते जलमय झाले. त्यामुळे वाहतुकीचा मोठाच खोळंबा झाला. हवामान खात्याने उत्तर भारतात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)