उत्तर प्रदेश, बिहारमधील लोकांमुळे मध्यप्रदेशात बेरोजगारी – कमलनाथ  

भोपाळ – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद हाती येताच कमलनाथ पूर्णपणे सक्रीय झाल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांमुळे मध्यप्रदेशात बेरोजगारी असल्याचे वक्तव्य कमलनाथ यांनी केले आहे.

मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी राज्यात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना उद्योग आणि कंपन्यांना सवलतीची मुभा दिली आहे. परंतु, यासाठी एक अटही ठेवण्यात आली आहे. यानुसार राज्यात त्याच उद्योग आणि कंपन्यांना सवलीती दिली जाईल जे ७० टक्के स्थानिक तरुणांना रोजगार देतील. तरच त्यांना सवलत दिली जाईल, असे कमलनाथ यांनी सांगितले. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमधून लोक येतात आणि नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही, असेही कमलनाथ यांनी सांगितले.

दरम्यान, कमलानाथ यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर दोन तासातच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. याचा फायदा ४० लाख शेतकऱ्यांना होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)