उत्तर प्रदेश; खासगी बसच्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू

लखनौ : उत्तरप्रदेशात खासगी बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 हून अधिकजण जखमी झाले आहेत. उत्तरप्रदेशच्या मैनपूर जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे.

अपघात झालेली खासगी बस मुजफ्फरपूरहून दिल्लीला जात होती. भरधाव वेगातील बसवरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यानंतर ही बस पलटली आणि यातच 16 जणांचा मृत्यू झाला.

-Ads-

या भीषण अपघातात 15 हून अधिकजण जखमी झाले असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील प्रवाशांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींवर योग्य उपचारांसाठीही रुग्णालयांना निर्देश दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)