उत्तर प्रदेशात 1366 शाऴांना योग्य इमारती नाहीत-कॅग

लखनऊ (उत्तर प्रदेश)-पुरेसे फंड उपलब्ध असूनही उत्तर प्रदेशातील 1366 शाळांना योग्य इमारती नाहीत आणि काही शाळा तर झापाच्या छताखाली भरवल्या जातात असे कॅग (भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक)ने आपल्या अहवालात नोंदवले आहे.
कॅगचा अहवाल आज उत्तर प्रदेश विधानसभेत सादर करण्यात आला. राज्यातील एकूण 1 लाख 60 हजार शाळांपैकी2,978 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याची आणि 1734 शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शौचालये नसल्याची माहिती अहवालात देण्यात आलेली आहे.
एकूण 50,849 शाळांना स्वत;ची खेळाची मैदाने नाहीत, 35,995 शाळांना स्वत:ची ग्रंथालये नसल्याची माहिती कॅगच्या या 235 पानी अहवालात देण्यात आलेली आहे.
एक धक्कादायक गोष्ट म्हणजे हीवायरिंग आणि विद्युत उपकरणांसांठी 64.22 कोटी रुपये खर्च करूनही 34,094 शाळांमध्य विजेची सुविधा नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुरेसे अनुदान मिळूनही 20112 ते 2016 या कालवधीत (अखिलेश यादव सरकारच्या काळात) 26.22 लाख विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आलेले नाही. याच काळात 97 लाख विद्यार्थ्यांना गणवेशही पुरविण्यात आले नाहीत असे कॅगच्या या अहवालात सांगण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)