उत्तर प्रदेशात सरकारी रुग्णालयाला भीषण आग; 6 रूग्णांचा मृत्यू

लखनऊ – किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या दृर्घटनेनंतर सर्व रुग्णांना या सेंटरच्या बाहेर हालवण्यात आले. मात्र, गंभीर जखमा झाल्यामुळे यातील सहा रूग्णांचा उगचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या आगीमुळे ट्रॉमा सेंटरचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले.

विशेष म्हणजे रूग्णालयात उपस्थित असणाऱ्या लोकांनी सांगितले की, या ठिकाणी उपलब्ध असलेली आग विझवण्याची उपकरणे काम करत नव्हती. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. याप्रकरणी रूग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोपही रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

रूग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, औषधे ठेवण्यात येणाऱ्या स्टोअरमध्ये ही आग लागली होती. प्रशासनाच्या दाव्यानूसार, आग लागल्यानंतर रूग्णालय प्रशासनाने सुमारे 150 लोकांना दुसऱ्या रूग्णालयात हालवण्यात आले. मात्र, रूग्णालय प्रशासनाने आम्हाला कोणतीही मदत न केल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. उलट एका स्ट्रेचरवरून तीन तीन रुग्णांना न्यावे लागत होते असेही इथल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)