उत्तर प्रदेशात सपा, बसपाची आघाडी निश्‍चित

लखनौ: उत्तर प्रदेशात आगामी लोकसभा निवडणूकीसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी निश्‍चित केली आहे. समाजवादी पार्टीच्या नेत्याने शनिवारी ही माहिती दिली. या महिन्याच्या अखेरीस या दोन्ही पक्षांमधील आघाडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे, असे सपाचे राष्ट्रीय प्रवक्‍ते राजेंद्र चौधरी यांनी पीटीआयला सांगितले.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यात या संदर्भाने अनेक बैठका झाल्या. शुक्रवारीही या दोघांची बैठक झाली आणि त्यानंतर या दोघांनी या आघाडीला तत्वतः मंजूरी दिली आहे.
उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिम भागात अस्तित्व असलेल्या राष्ट्रीय लोक दलसह अन्य पक्षांशीही चर्चा सुरु आहे. या आघाडीमध्ये कॉंग्रेसला सहभागी करून घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय अखिलेश आणि मायावती मिळून घेतील, असेही या प्रवक्‍त्याने सांगितले.

भाजपने मात्र ही आघाडी संधीसाधू आणि जनता विरोधी असल्याचे म्हटले आहे. ही संधीसाधू आघाडी यशस्वी होऊ शकणार नाही, असे उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रवक्‍ते हिरो बाजपेयी यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)