उत्तर प्रदेशात वायर बसवर पडून 4 ठार 25 जखमी

लखनऊ (उत्तर प्रदेश)- 11,000 व्होल्टची एचटी वायर बसवर पडल्याने चार बसमधील चारजण मरण पावल्याची आणि 15 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथे ही दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन मंडळाची (यूपीएसआरटीसी) बस बांद्याहून हमीरपूरला जात होती. या बसवर 11,000 व्होल्टची हाय टेन्शन वायर पडल्याने बस जळून खाक झाली. बसमधील चार जन मरण पावले असून 25 जण जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसवर वायर पडताच स्टीयरिंग “फेल’ झाल्याने ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्याने बस एका इलेक्‍ट्रिक पोलवर आदळली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या एक खड्ड्यात पडली. जसपुरा-भाटामार्गावर ही दुर्घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)