उत्तर प्रदेशात चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये बलात्काराची धक्कादायक घटना उघड झाली आहे. चालत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार करुन तिला कारमधून फेकून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणातील गुरुग्राममध्ये बलात्कार करण्यात आला आणि ग्रेटर नोएडामध्ये आणून फेकून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
पीडित महिला गंभीर असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महिलेचे हरियाणातील सोहना येथून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीच्या रस्त्यांवर तिच्यावर अत्याचार करण्यात आले आणि सकाळी तिला रस्त्यावर फेकून देण्यात आले. पोलिसांना बेशुद्ध अवस्थेतील या महिलेची माहिती मिळताच तातडीने तिला रुग्णालयात भरती केले. यानंतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोहना येथून जबरदस्तीने तीन तरुणांनी स्विफ्ट कारमध्ये बसवले. तिन्हीही नराधमांनी शारीरिक अत्याचार केले आणि कारमधून बाहेर फेकले, अशी माहिती पीडितेने दिली. महिलेचे वय अंदाजे 35 वर्षे आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)