उत्तर प्रदेशात ऑपरेशन ‘दस्तक’ अंतर्गत 24 तासात 182 गुंड गजाआड

लखनौ : उत्तर प्रदेशात रविवारी एका रात्रीत सहा एन्काऊंटर केल्यानंतर आता गाझियाबादमध्ये उत्तर प्रदेश पालिसांनी ऑपरेशन ‘दस्तक’ राबवले. ज्यामध्ये 24 तासात 182 गुंड गजाआड केल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑपरेशन ‘दस्तक’ शनिवारी सकाळी 8 वाजता सुरु झाले, ज्यामध्ये 81 वाँटेड आणि 101 असे आरोपी ज्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात अटक करण्यात आलेल्या 270 जणांची यादी तयार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी 12 तास राबवलेल्या मोहिमेनंतर 24 इतर आरोपींनी स्थानिक न्यायालयात जाऊन आत्मसमर्पण केलं. ज्यापैकी 12 जणांविरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत, तर बाकींच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. गुंडांची सफाई मोहिम चालूच राहणार असल्याचंही पोलिसांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशात एका रात्रीत एकानंतर एक अशा सहा एन्काऊंटरमध्ये दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला होता. नोएडा पोलिसांनी 1 लाख रुपयांचं इनाम असलेला वाँटेड गुंड श्रवन चौधरीला कंठस्नान घातलं. दिल्ली आणि नोएडात खुनाचे गुन्हा दाखल असलेला श्रवन अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी घटनास्थळाहून एके 47, एसबीबीएल गन आणि स्विफ्ट डिजायर जप्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)