उत्तर प्रदेशात एका रात्रीत तब्बल 6 एन्काऊंटर

वी दिल्ली : उत्तर प्रदेशात एका रात्रीत तब्बल सहा एन्काऊंटरमध्ये दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. नोएडा पोलिसांनी 1 लाख रुपयांचे इनाम असलेला वाँटेड गुंड श्रवन चौधरीला कंठस्नान घातले. दिल्ली आणि नोएडात खुनाचा गुन्हा दाखल असलेला श्रवन अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी घटनास्थळाहून एके 47, एसबीबीएल गन आणि स्विफ्ट डिजायर जप्त केली.

दिल्ली आणि नोएडातील मोस्ट वाँटेड गुंडाचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. त्याच्यावर दोन्ही ठिकाणी 50-50 हजार रुपये बक्षीस  ठेवण्यात आले होते. घटनास्थळाहून काही शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरीमध्येही पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जिंतेंद्र नावाचा गुंड जखमी झाला, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जितेंद्रवर 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

गाझियाबादमध्येही विजय नगर भागात रात्री उशीरा चकमक झाली. तर दुसरीकडे थाना सिहानीगेटच्या राजनगर भागात वाहनांची तपासणी करताना दोन दुचाकीस्वार गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात, एका गुंडाला गोळी लागली, तर दुसरा फरार झाला.

शनिवारी रात्री उशीरा सहारनपूरमध्ये पोलिसांनी सलीम नावाच्या गुंडाचा खात्मा केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. घटनास्थळाहून एक लाख रुपये, एक दुचाकी आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे. या गुंडाला पकडून देण्यासाठी 25 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मुजफ्फरनगरमध्येही पोलिसांच्या गोळीबारात दोन गुंड जखमी झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली. जखमी गुंडांना आणि पोलीस अधिकाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या गुंडांवर दरोडा, हत्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिसांनी गुंडांराज संपवण्याचा चंग बांधला आहे. गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला, तर त्याचे उत्तर गोळ्यांनीच दिले जाईल, असे काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ  यांनी म्हटले होते. तसेच राज्यातील एकही एन्काऊंटर बनावट नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)