उत्तर प्रदेशात एका रात्रीत 7 एन्काऊंटर

   दोन गुंडांचा खात्मा, शस्त्रही जप्त; सहा पोलीस कर्मचारी जखमी

लखनऊ – उत्तर प्रदेशात एकाच रात्रीत तब्बल 7 एन्काऊंटर करत दोन गुंडांचा खात्मा करण्यात आला असून सात जणांना अटक केली आहे. यात नोएडा पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षिस असलेला वॉंटेड गुंड श्रवन चौधरीचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एके 47, एसबीबीएल गन आणि स्विफ्ट डिजायर जप्त केली आहे.

दिल्ली आणि नोएडातील मोस्ट वॉंटेड गुंडाचा पोलीस चकमकीत खात्मा करण्यात आला. त्याच्यावर दोन्ही ठिकाणी 50-50 हजार रुपये बक्षिस होते. घटनास्थळाहून काही शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालक प्रवीण कुमार यांनी दिली. सहारनपूर, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर आणि मुजफ्फरनगर जिल्ह्यात 24 तासात 7 एन्काऊंटर करत ही धडक कारवाई करण्यात आली. यात सहा पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्धनगर येथे मोस्ट वॉटेड श्रवण चौधरी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून केलेल्या एन्काऊंटरमध्ये मोस्ट वॉंटेड श्रवण चौधरी जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या कारवाईत पोलीस अधिक्षक बलवान सिंग आणि पोलीस शिपाई सत्यवीर आणि संजीव हे जखमी झाले. दादरीमध्येही पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जिंतेंद्र नावाचा गुंड जखमी झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जितेंद्रवर 25 हजार रुपयांचे बक्षिस होते.

गाझियाबादमध्येही विजय नगर भागात रात्री उशीरा चकमक झाली. तर दुसरीकडे थाना सिहानीगेटच्या राजनगर भागात वाहनांची तपासणी करताना दोन दुचाकीस्वार गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एका गुंडाला गोळी लागली, तर दुसरा फरार झाला. शनिवारी रात्री उशीरा सहारनपूरमध्ये पोलिसांनी सलीम नावाच्या गुंडाचा खात्मा केला. यामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. घटनास्थळाहून एक लाख रुपये, एक दुचाकी आणि बंदूक जप्त करण्यात आली आहे. मुजफ्फरनगरमध्येही पोलिसांच्या गोळीबारात दोन गुंड जखमी झाले. तर एका पोलीस अधिकाऱ्यालाही गोळी लागली. जखमी गुंडांना आणि पोलीस अधिकाऱ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुंडांवर दरोडा, हत्या असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)