उत्तर प्रदेशातील महिला आश्रमातील 24 मुलींची सुटका

लैंगिक शोषण होत असल्याचे प्रकरण उघडकीस


मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडून गंभीर दखल


उच्चस्तरिय चौकशीचे आदेश

देओरिया / लखनौ – उत्तर प्रदेशातील देवरिया भागातील एका महिला आश्रमात कैदी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या आरोपानंतर या आश्रमातील 24 मुलींना सोडवण्यात आले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील महिला आश्रमात मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण ताजे असतानाच उत्तर प्रदेशातील तशाच प्रकरणामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हटवले आहे. तसेच या घटनेच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघाजणांना अटक केली आहे. त्यामध्ये हा आश्रम चालवणाऱ्या एका दाम्पत्याचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मां विंध्यावासिनी महिला प्रशिक्षण एवंम समाज सेवा संस्था नावाच्या या महिला आश्रमामध्ये 42 कैदी महिलांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 18 कैदी महिला अद्यापही बेपत्ता आहेत. आता या आश्रमाला सील ठोकण्यात आले आहे, असे पोलिस अधिक्षक रोहन पी. काणे यांनी देओरियामध्ये सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हा दंडाधिकारी सुजित कुमार यांना हटवले आहे. हा आश्रम चालवणाऱ्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्‍त मुख्य सचिव दर्जाचे दोन अधिकारी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत. या चौकशीचा अहवाल दिवसभरात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे उत्तर प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री रिटा बहुगुणा जोशी यांना लखनौमध्ये सांगितले. जिल्हा प्रोबेशन ऑफिसरला निलंबित करण्यात आले असून अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या महिला आश्रमातील सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी महिला डॉक्‍टरांकडून करण्यात येणार आहे.

आर्थिक व्यवहारामध्ये अनियमितता असल्याचा अहवाल सीबीआयकडून मिळाल्यावर या संस्थेची नोंदणी जून 2017 मध्येच स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर प्रशासनाने सर्व कैदी महिलांना हलवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र न्यायालयाने “स्टे’ दिला असे सांगून व्यवस्थापक आश्रम चालवत होती. पण न्यायालयाचे आदेश दाखवू न शकल्यावर प्रशासनाने सर्व मुलींना हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यास व्यवस्थापिकेने सहकार्य केले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

10 वर्षाच्या मुलीमुळे प्रकरण उघड…
देवरिया महिला आश्रमातील 10 वर्षाच्या एका मुलीने पळून जाऊन कैदी महिलांच्या दुःखाबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. अनेकवेळा काळ्या आणि लाल रंगाच्या कार येतात आणि मुलींना घेऊन जातात आणि सकाळी परत आणून सोडतात. मात्र सकाळी त्या मुली रडत असतात, असा आरोप या लहान मुलीने केला होता. दररोज दुपारी 4 वाजता एक कार येते आणि काही मुलींना आणि व्यवस्थापकाला बरोबर नेते, असे या मुलीने म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)