उत्तर प्रदेशमध्ये न्यू फराक्का एक्स्प्रेस रुळावरून घसरली : सात जणांचा मृत्यू 

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये न्यू फराक्का एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. हरचंदपूर स्टेशनपासून ५० मीटर अंतरावर न्यू फराक्का एक्स्प्रेसचे नऊ डब्बे रुळावरून घसरले. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१ जण जखमी आहेत. घटनास्थळी पोलीस व स्थानिक नागरिकांकडून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान, बचाव कार्यासाठी एनडीआरएफ टीमलाही पाचारण करण्यात आले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटूंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

कसा झाला अपघात – 
न्यू फराक्का एक्स्प्रेस फरक्काकडून नवी दिल्ली येथे जात होती. परंतु, हरचंदपूर स्टेशननजीक चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे हा अपघात घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)