उत्तर प्रदेशमधील कासगंजमध्ये नव्याने हिंसाचार

प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीवर दगडफेक; 49 जणांना अटक

कासगंज – संचारबंदी लागू असलेल्या कासगंज भागामध्ये आज नव्याने हिंसाचार उसळला. काही समाज कंटकांनी दोन दुकानांना आणि एका बसला आग लावली. या हिंसाचार प्रकरणी कालच 9 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हिंसाचारादरम्यान एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता. तर अन्य दोघेजण जखमी झाले होते, असे पोलिसांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मथुरा बरेली महामार्गावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विश्‍व हिंदू परिषदेने काढलेल्या मोटरसायकल रॅलीवर दगडफेक झाली होती. त्यानंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

काल झालेल्या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 49 जणांना अटक करण्यात आली आहे, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. कसागंज पोलिस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. समाजकंटकांनी शहरामध्ये प्रवेश करू नये यासाठी “रॅपिड ऍक्‍शन फोर्स’ आणि “प्रोव्हिन्शियल आर्म्ड कॉन्स्टॅबुलरी’च्या तुकड्या जिल्ह्यामध्ये बारिक लक्ष ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)