उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एका घरातून 6,000 कासवांची मुक्‍तता

अमेठी (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एका घरातून 6,000 कासवांची मुक्‍तता करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलीसांनी दिली आहे. उत्तर प्रदेश पोलीसांच्या एसटीएफ (स्पेशल टास्क फोर्स)ने वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली गौरीगंजमधील एका घरावर घातलेल्या धाडीत ही कासवे मिळाली. त्यापैकी काही पोत्यांमध्ये भरून ठेवण्यात आली होती, तर बरीचशी घराभोवतीच्या जागेत मोकळीच ठेवण्यात आली होती, या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून यामागे तस्करी टोळीचा हात असावा असा असा अंदाज करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू आहे, असे सांगण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या वन विभागाने राज्यभर सावधगिरीचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या गंगातटीय भागात कासवे मोठ्या प्रमाणावर आढळतात. कासवांच्या तस्करीचे जाळे उत्तर प्रदेश, बिहारपासून ते पश्‍चिम बंगाल आणि आसामपयर्यंत पसरलेले आहे. कोलकात्यातून या कासवांची बांगला देश, म्यान्मार, चीन, थायलॅंड, हॉंगकॉंग आणि दक्षिणपूर्वेतील देशांध्ये तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात कासवांना त्यांचे मंस, फेंग-शुईसाठी वापर, औषधनिर्मिती आदी कारणांसाठी मोठी मागणी आहे. मकरसंक्रांत पर्व कालात कासवाच्या मांसाला मोठी मागणी असते. असे चतुर्वेदी यांनी सांगितले आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)