उत्तर कोरिया प्रकरणी ट्रम्प यांना चीनकडून सबुरीचा सल्ला

वॉशिंग्टन/ बिजींग,  – उत्तर कोरिया प्रकरणावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सबुरी बाळगावी, असा सल्ला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या उत्तर कोरियाविरोधी वक्‍तव्यांमुळे आगोदरच तणावपूर्ण असलेल्या परिस्थितीमध्ये अधिकच तणाव निर्माण होईल, असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या पुढाकाराने संयुक्‍त राष्ट्राने उत्तर कोरियावर कठोर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी या आठवड्यात अमेरिकेला थेट धमकी द्‌ली होती. तसेच अमेरिकेच्या ताब्यातील ग्युएम या बेटाच्या दिशेने क्षेपणास्त्रेही डागली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभुमीवर जिनपिंग आणि ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या मुद्दयावरून फोनवरून चर्चा केली.

या तणावावर योग्य तोडगा शोधण्यासाठी अमेरिकेबरोबर काम करण्यास चीनची तयारी आहे, त्यासाठी तणाव वाढवणारी वक्‍तव्ये आणि कृती करणे टाळावे आणि संयम बाळगावा असे जिनपिंग यांनी ट्रम्प यांना सांगितले आहे, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

उत्तर कोरियाने चिथावणीखोर कृती थांबवलीच पाहिजे, यावर ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यामध्ये एकमत झाले असल्याचे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाला चांगलाच धडा शिकवण्यासाठी ट्रम्प उत्सुक आहेत. मात्र अमेरिकेबरोबर परस्पर सहमतीच्या आधारे निकटचे संबंध आपल्याला हवे, आहेत. त्यामुळे हा विषय मतभेदाचा मुद्दा होऊ नये, अशी आपली अपेक्षा असल्याचेही जिनपिंग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)