उत्तर कोरियाशी आमची थेट चर्चा सुरू – ट्रम्प 

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचे उच्च स्तरीय अधिकारी उत्तर कोरियाशी सध्या थेट संपर्कात आहेत असे म्हटले आहे. अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांच्यात लवकरच थेट बोलणी होणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या बैठकीबाबतचा तपशील सध्या ठरवला जात असून दोन्ही देशांचे अधिकारी परस्परांशक्ष थेट चर्चा करून हा तपशील ठरवत आहेत अशी माहिती स्वत: ट्रम्प यांनी दिली. या आधी ही चर्चा दक्षिण कोरियाच्या माध्यमातून व्हायची पण आता अमेरिका आणि उत्तर कोरिया हे एकमेकांच्या थेट संपर्कात आल्याने त्या घडामोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष महत्व दिले जात आहे.

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधांबाबत सध्या चांगल्या घडामोडी घडत असून त्याबद्दल मी समाधानी आहे पण प्रत्यक्षात निर्णय काय होतो ते महत्वाचे आहे. आमच्यात बैठक होईल की नाही त्याचा मी विचार करीतच नाही निर्णय काय होईल हे मला अधिक महत्वाचे वाटते आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)