उत्तर कोरियात मायकेल जॅक्‍सनच्या गाण्यांवर बंदी

प्योंगयोंग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आताही ते त्यांच्या एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. तो म्हणजे पॉप गायक मायकल जॅक्‍सनचे संगीत आता कोरियात ऐकता येणार नाही. किम जोंग यांना मायकल जॅक्‍सन अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्याचा डान्स आणि गाणे ऐकण्यासाठी कोरियात बंदी घालण्यात आली आहे.

किम यांच्या या निर्णयावर उत्तर कोरियातील जनता मात्र नाराज आहे. कारण उत्तर कोरियात मायकल जॅक्‍सनचे अनेक चाहते आहेत. किम जोंग यांना केवळ मायकल जॅक्‍सन आवडत नाही, असे नाही. मुळात किम जोंग यांना मायकल जॅक्‍सन नाही तर अमेरिकेची कोणतीही गोष्ट आवडत नाही. त्यांना अमेरिकेबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. अमेरिकेच्या अनेक गोष्टींवर त्यांनी उत्तर कोरियात बंदी घातली आहे. त्यामुळे ज्याच्या गाण्याचे उत्तर कोरियन चाहते आहेत त्या मायकल जॅक्‍सनच्या गाण्याला आणि डान्सला किम जोंग यांनी बंदी घातली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)