उत्तर कोरियातील लोकांनाच नाही दिसली ट्रम्प-किम भेट

सिंगापूर – संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेली ट्रम्प-किम जोंग उन यांच्यातील ऐतिहासिक शिखर परिषद आज सिंगापूरमध्ये पार पडली. सुमारे 3,000 पत्रकारांनी संपूर्ण जगभर तिचे वृत्तांत दिले, व्हिडियो प्रसारित केले. जगभरातील लोकांनी ते उत्सुकतेने पाहिले, मात्र खुद्द उत्तर कोरियातील जनतेला त्यातील काहीच पाहायला मिळाले नाही.

उत्तर कोरियातील केसीटीव्ही (कोरियन सेंट्रल टेलिव्हिजन) या सरकारी चॅनलने ट्रम्प-किम मुलाखत दाखवलीच नाही. त्याबद्दल काहीही माहिती दिली नाही. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता प्रसारण सुरू झाले, तेव्हा किम जोंग उन हे सिंगापूरच्या दौऱ्यावर आहेत एवढीच माहिती देण्यात आली. त्यात फोटो वा व्हिडियो दाखवले नाहीत. कोरियन वृत्तपत्र सोडोंग सिनमूनमध्ये किमच्या सिंगापूर दौऱ्याचे 14 फोटो छापण्यात आले, पण त्यात ट्रम्प यांचा उल्लेख वा फोटो नव्हता. किम यांच्या सिंगापूरच्या अधिकाऱ्यांच्या भेटीचे ते फोटो होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)