उत्तर कोरियातील बसच्या भीषण अपघातात ३० चिनी पर्यटकांचा मृत्यू

सेउल : उत्तर कोरियामध्ये एका पर्यटन कंपनीच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास ३० चिनी पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ह्युंगाई हायवेवर ही दुर्घटना झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

या अपघाताची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र उत्तर कोरिया प्रशासनाच्या माहितीनुसार, ह्युंगाई महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु होते. तसेच खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक हे बीजिंग येथील चायनिज ट्रॅव्हल कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर कोरियातील चायनिज दुतावासानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)