उत्तर कोरियातील दूतावास मलेशिया पुन्हा सुरू करणार

कुआलांपूर – मलेशियाने वर्षभरापूर्वी बंद केलेला उत्तर कोरियातील आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्या सावत्र बंधूची कुआलांपूरमध्ये हत्या झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाले होते. त्यामुळेच उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयोंगमधील आपला दूतावास बंद मलेशियाने बंद केला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात सिंगापूरमध्ये ऐतिहासिक परिषदेत उत्तर कोरियाकडून निःशस्त्रीकरणाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाल्यावर मलेशियाने दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

किम जोंग उन यांचे बऱ्याच काळापासून दूर राहिलेले सावत्र बंधू किम जोंग नाम यांची गेल्यवार्षी फेब्रुवारीमध्ये कुआलालांपूरच्या विमानतळावर हत्या झाली होती. हल्लेखोराने नाम यांच्या चेहऱ्यावर मज्जातंतूंवर आघात करणारे द्रव्य फवारले होते. अशाप्रकारे हत्या करण्याचे तंत्र शीतयुद्धकाळात अवलंबले जात असे. या हत्येनंतर उत्तर कोरिया आणि मलेशिया या दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना आपल्या देशातून हाकलून दिले होते. तसेच आपल्या नागरिकांना दुसऱ्या देशात जाण्यासही मज्जाव केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)