उत्तर कोरियाच्या निर्णयाचे चीननेही केले स्वागत

बिजींग – उत्तर कोरियाने अण्विक चाचण्या थांबवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचे चीननेही स्वागत केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अण्विक निशस्त्रीकरणाला प्राधान्य मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे कोरियन द्विपकल्पातील तणाव निवळण्यासही मदत होणार आहे असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते लु कंग यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाने या संबंधात सर्व सबंधितांशी चर्चा व सल्लामसलत करण्यास आमचा त्यांना पाठिंबाच राहील असेही चीनने म्हटले आहे. उत्तर कोरियाचे प्रमुख किम यांनी चाचण्या थांबवण्याचा निर्णय घेतला असला तरी स्वत:कडील अण्वस्त्रे ते निकामी करणार आहेत की नाही या विषयी मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. त्या विषयी चीनने प्रतिक्रीया देण्याचे टाळले आहे. चाचणी बंदीचा त्यांचा निर्णय निशस्त्रीकरणाच्या दिशेने टाकण्यात आलेले महत्वाचे पाउल आहे असेही त्यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाने आता आपल्या सोशालिस्ट आर्थिक धोरणावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे अशी अपेक्षाही चीनने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)