उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रे हल्ल्याने अमेरिकेला भरली धडकी….

वॉशिंग्टन : उत्तर कोरिया आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करेल अशी भिती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेपर्यंत पल्ला असलेली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या ताफ्यात असू शकतात असे अमेरिकेला वाटते. अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पिओ यांनी एका मुलाखतीत ही कबुली दिली.
उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनपासून असणा-या धोक्याविषयी आमच्या गुप्तचरयंत्रणेमध्ये नेहमी चर्चा होत असते असे पॉम्पिओ यांनी सांगितले. पुढच्या काही महिन्यात उत्तर कोरिया अमेरिकेवर अण्वस्त्र हल्ला करेल का ? त्याविषयी आमची चर्चा होते. उत्तर कोरियाच्या संभाव्य हालचालींविषयी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपर्यंत अचूक गुप्तचर माहिती पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. जेणेकरुन या संकटाचा समर्थपणे सामना करता येईल असे पॉम्पिओ यांनी सांगितले.
उत्तर कोरियाच्या विरोधात सैन्यबळाचा वापर केल्यास मोठया प्रमाणावर जिवीतहानी होईल असे पॉम्पिओ म्हणाले. किमला हटवणे किंवा त्याला अमेरिकेविरोधात अण्वस्त्राचा वापर करण्यापासून कसे रोखायचे यावर विचार केल्यास अनेक गोष्टी शक्य आहेत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)