उत्तर कोरियाची अमेरिकेला धमकी

वॉशिंग्टन:संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध धुडकावून लावत उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिली आहे. अमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यामुळे सुरक्षा परिषदेने एकमताने उत्तर कोरियावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या कापड निर्यातीवर बंदी आणली असून, तेल आयात करण्यावरही मर्यादा आणल्या आहेत. यूएनच्या निर्बंधामुळे उत्तर कोरियाच्या कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेला थोडी झळ बसेल. कापड उद्योगात चीन उत्तर कोरियाचा सर्वात मोठा भागीदार आहे. उत्तर कोरियातून चीनला  80 टक्के कापड निर्यात होते. अमेरिकेतीलही काही कापड उद्योजक उत्तर कोरियावर अवलंबून आहेत.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या बेकायदा, नियमबाहय ठरावाचा मी निषेध करतो असे उत्तर कोरियाच्या राजदूत हान टाई यांनी जिनेव्हामधील परिषदेत बोलताना सांगितले. ते म्हणाले अमेरिकेमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन पाहत आहे  . अमेरिकेने इतिहासातील सर्वात मोठी वेदना सहन करण्यासाठी तयार राहावे अशी धमकीच उत्तर कोरियाच्या राजदूताने दिली आहे. सप्टेंबर महिन्यात उत्तर कोरियाने शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्यानंतर जगभरातून उत्तर कोरियाचा निषेध करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)